मुंबई: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. कितीही मोठे झालो, तरी प्रत्येकाला शाळेतले शिक्षक आजही लख्ख आठवतात. आजच्या शिक्षक दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेता यांनी त्यांच्या आयुष्यातील शिक्षकांना वंदन केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केलाय. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या शाळेतली मराठी विषय शिकवणाऱ्या रेडकर बाईंचा फोटो शेअर केलाय. यापूर्वीही जॅकी श्रॉफ यांनी अनेक मुलाखतींमध्ये शाळेतील शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला होता. जॅकी श्रॉफ यांचं शिक्षण मुंबईतील मास्टर्स ट्युटोरियल शाळेत झालं. शाळेतील या जॅकी यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी यांनी रेडकर बाईंबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. 'रेडकर बाईंचं शिकवणं मला फार आवडयाचं, त्या नेहमीच मला प्रोत्साहन द्यायच्या' असं सांगताना जॅकी यांनी अश्रृ अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tfpxIG