मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी वरील पूर्व सदस्य हिला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. उर्फीचा एअरपोर्टवरील लुक प्रचंड वायरल झाला होता. उर्फीने जीन्स सोबत डेनिम शर्ट परिधान केला होता. परंतु, छातीपर्यंत असलेल्या शर्टमधून उर्फीची अंतवस्त्र स्पष्टपणे दिसत होती. उर्फीचे हे कपडे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. आता उर्फीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्धी मिळवायची असती तर कपडे न घालताच गेले असते असं तिने म्हटलं आहे. ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत उर्फीने म्हटलं, 'जर मला प्रसिद्धी मिळवायची असती तर कपड्यांशिवाय मी एअरपोर्टवर गेले असते. मी माझ्या कपड्यांपेक्षा जास्त काहीतरी आहे. लोक फक्त माझे कपडे पाहतात. ते माझ्याबद्दल का बोलू शकत अहित? मला हे कळून चुकलंय की मी काहीही पोस्ट केलं, बोलले तरी लोक काहीना काही बोलणारच. मग मी बिकिनी घातली काय किंवा सलवार कमीज घातली काय त्यांना फरक नाही पडत. मी लखनऊमधील एका परंपरा मानणाऱ्या कुटुंबातून आली आहे. मी त्या वातावरणात वाढली. पण आम्हाला कपड्यांबद्दल कुणीही सक्ती केली नाही. आज मी ते कपडे घालते जे मला आवडतात. मला फरक पडत नाही की लोक काय म्हणतात.' यापुढे उर्फी म्हणाली, 'मी जिथे जाते तिथल्या जागेला अनुसरून कपडे घालते. पहिल्यांदा हे सगळं ऐकून मला वाटायचं की मी काही चूक करतेय पण आता मला कळालंय की मी काहीही केलं तरी लोक चुका काढणारच. आता मी शहाणी झाली आहे. मला या गोष्टींनी फरक नाही पडत.' उर्फीला तिच्या पेहरावावरून बरंच काही सुनावण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lcGccz