नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. २०० रुपये ते ३०० रुपयांच्या रेंज मध्ये कंपनीचे अनेक जबरदस्त प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा एक जबरदस्त प्लान बद्दल माहिती सांगणार आहोत. या प्लानमध्ये तुम्हाला रोज २ जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत अनेक बेनिफिट्स मिळतात. प्लानची किंमत २४९ रुपये आहे. Jio चा २४९ रुपयाचा प्लान रिलायन्स जिओचा २४९ रुपयाचा प्लान रोज २ जीबी डेटा सोबत येतो. कंपनीच्या या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. म्हणजेच युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. यात ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, ग्राहकांना जिओ अॅप्स (JioTV, JioCinema, JioSecurity, JioNews आणि JioCloud) चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. चा २४९ रुपयाचा प्लान एअरटेलचा २४९ रुपयाच्या प्लानमध्ये जिओ पेक्षा कमी डेटा मिळतो. परंतु, याची वैधता सारखीच आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये २८ दिवसासाठी रोज १.५ जीबीचा डेटा देत आहे. युजर्संना एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय, Airtel Xstream वर फ्री मध्ये व्हिडिओ पाहू शकता. तसेच Wynk Music फ्रीमध्ये गाणे डाउनलोड करू शकता. चा २४९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा प्लानमधील सुविधा जवळपास एअरटेलच्या प्लानसारखीच आहे. वोडाफोन आयडियाच्या २४९ रुपयाच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबीचा डेटा आणि २८ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय, प्लानमध्ये १०० एसएमएस रोज मिळतील. याशिवाय, प्लानमध्ये मनोरंजनासाठी तुम्हाला व्हीआय मूव्हीज आणि टीव्हीचे अॅक्सेस मिळेल. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XbpjHf