Full Width(True/False)

बिग बॉस मराठी ३ मधील 'हे' कलाकार होते पती- पत्नी; काही वर्षात झाले विभक्त

मुंबई- मराठी मालिकाविश्वात प्रचंड गाजणारा कार्यक्रम '' पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनाली पाटील, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे यांसारखे एकाहून एक अवली कलाकार सदस्य म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु, यावेळेस आणखी एका कारणामुळे 'बिग बॉस मराठी ३' चर्चेत आहे. घरात एण्ट्री करणाऱ्या सदस्यांमधील दोन सदस्यांचं पूर्वीपासूनच नातं आहे. हे सदस्य कधीकाळी पती- पत्नी होते. घरातील सदस्य आणि यांचा घटस्फोट झाला आहे. 'काटा रुते कुणाला' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्नेहा आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता आविष्कार यांचं लग्न झालं होतं. वयाच्या १९ व्या वर्षी स्नेहाने आविष्कारासोबत विवाह केला होता. परंतु, अवघ्या काही वर्षातच ते एकमेकांपासून वेगळे झाले. स्नेहाने आविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. शांतपणे सगळं सहन करण्याऐवजी स्नेहाने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अखेर आविष्कार आणि स्नेहा यांनी घटस्फोट घेतला. परंतु, 'बिग बॉस मराठी ३' च्या घरात स्नेहा आणि आविष्कार दोघेही आमनेसामने आल्याने प्रेक्षकांना त्यांची नवी केमिस्ट्री पाहायला मिळू शकते. स्नेहा आणि आविष्कार या दोघांनाही एकमेकांच्या घरातील उपस्थिती बद्दल तसूभरही कल्पना नसल्याने दोघेही अवघडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यातही स्नेहा आविष्काराला पाहून प्रचंड अस्वस्थ दिसली. आता घरातील वातावरणात दोघांमध्ये चांगली मैत्री होते की ते एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकतात हे लवकरच कळेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EtpnCZ