नवी दिल्ली : आज काल प्रत्येकाच्याच घरी वॉशिंग मशीन असतेच. कपडे धुण्याची मेहनत वाचविणारे हे डिव्हाइस प्रत्येकासाठीच उपयुक्त आहे. पण, अनेकदा बजेटमुळे हवी ती मशीन खरेदी करता येत नाही. पण, आता किमतीचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण, ने भारतात वॉशिंग Machine च्या अनेक नवीन रेंज लाँच केल्या असून या सर्व वॉशिंग मशीन सेमी-ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये सादर करण्यात आहेत. Candes च्या या वॉशिंग मशिनना शॉक रेझिस्टंट साठी IPX4 रेट केले आहे. हे वॉशिंग मशीन ६.५ किलो, ७.२ किलो आणि ९ किलो आकारात उपलब्ध असतील आणि मुख्य म्हणजे या मशिन्स सर्वांच्याच बजेटमध्ये बसतील अशा आहेत. पाहा डिटेल्स. वाचा: सर्व वॉशिंग मशीन FRVO ग्रेड केबल्स वापरतात आणि सर्व दोन वर्षांच्या वॉरंटीसह येतात. ६.५ किलो मशीनचे वजन १८.५ किलो आहे, तर ७.२ किलो मॉडेलचे वजन १९. ५ किलो आणि ९ किलो मॉडेलचे वजन २८.५ किलो आहे. मशीनची किंमत ६.५ किलो मॉडेलसाठी ६, ९९९ रुपये, ७.२ किलो मॉडेलसाठी ८,१९९ रुपये आणि ९ किलो मॉडेलसाठी १०,९९९ रुपये आहे. कंपनीच्या वेबसाईट व्यतिरिक्त, सर्व मॉडेल्स प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करता येतील. Candes ची ही वॉशिंग मशीन भारतीय बाजारात व्हाईट वेस्टिंग हाऊस सोबत स्पर्धा करेल. व्हाईट वेस्टिंग हाऊसच्या वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत ६, ९९० रुपये आहे. या व्यतिरिक्त, Candes प्रसिद्ध फ्रेंच कंपनी थॉमसनच्या वॉशिंग मशीन सोबत देखील स्पर्धा करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lf1FkT