नवी दिल्ली : ने आपल्या बेस्ट स्ट्रिमिंग डिव्हाइस ला भारतात लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, Fire TV Stick 4K पेक्षा हे डिव्हाइस ४० टक्के अधिक पॉवरफुल आहे. यात १.८ GHz क्वाड कोर प्रोसेसर आणि २ जीबी रॅम दिले आहे. Amazon Fire TV Stick 4K Max हे कंपनीचे पहिले मीडिया प्लेअर आहे, ज्यात वाय-फाय ६ सपोर्ट देण्यात आला आहे. वाचा: India चे प्रमुख पराग गुप्ता यांच्यानुसार व्हीडिओ स्ट्रिमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन Fire TV Stick 4K Max द्वारे बेस्ट सेलिंग स्ट्रिमिंग मीडिया प्लेअरला अधिक शानदार बनवू शकता. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय मिळेल. Amazon Fire TV Stick 4K Max प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, याची किंमत ६,४९९ रुपये आहे. डिव्हाइसला Amazon.in आणि ठराविक मॉलमध्ये Amazon kiosks वरुन प्री-ऑर्डर करू शकता. ७ ऑक्टोबरपासून याची विक्री सुरू होईल. Amazon Fire TV Stick 4K Max चे स्पेसिफिकेशन्स Amazon Fire TV Stick 4K Max देखील जुन्या व्हर्जनप्रमाणेच समान डिझाइनमध्ये येईल. यामध्ये ४के UHD, HDR आणि HDR १०+ सह Dolby Vision आणि Dolby Atmos सपोर्ट मिळेल. याद्वारे तुम्ही थिएटर सारखा आनंद घेऊ शकता. यात मिळणाऱ्या Alexa वॉइस रिमोट द्वारे स्मार्ट होम मॅनेज, प्लेबॅक कंट्रोल करता येईल. यात चार प्रीसेट बटन देण्यात आले आहे. याद्वारे अ‍ॅपमध्ये सहज स्विच करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hnftZy