नवी दिल्लीः स्मार्टफोन आता आवश्यक गोष्ट बनली आहे. याचा उद्देश फक्त कॉल करण्यापर्यंत राहिला नाही. स्मार्टफोनवर मल्टी टास्किंगसाठी जबरदस्त बॅटरी लाइफची गरज आहे. यासाठी अनेक स्मार्टफोन्स आहेत. जी चांगली बॅटरी लाइफ देतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५००० एमएएच क्षमतेच्या जबरदस्त बॅटरी बॅकअपचे स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यातील अनेक स्मार्टफोन्स ५जी सपोर्ट करतात. Realme 8 5G रियलमीच्या या स्मार्टफोनला तुम्ही १४ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. जर तुम्हाला एक चांगल्या बॅटरी सोबत ५ जी फोन खरेदी करायचा असेल तर हा फोन तुमच्यासाठी चांगला आहे. यात मीडिया टेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर दिला आहे. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Redmi Note 10T 5G रेडमीच्या या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. Moto G60 मोटोच्या या फोनमध्ये नियर स्टॉक अँड्रॉयड दिला आहे. यात ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी TurboPower 20 फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. Poco M3 Pro 5G Realme 8 5G आणि Redmi Note 10T 5G सारखेच Poco M3 Pro 5G चे फीचर्स आहेत. या फोनमध्ये Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jPiseN