ग्राहकांकडून True Wireless Earbuds ला मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळत आहे. यामुळे कंपन्या देखील नवनवीन इयरबड्स लाँच करत आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किंमतीत शानदार फीचर्ससह येणारे इयरबड्स लाँच करत आहे. ट्रू वायरलेस इयरबड्समध्ये यूजर्सला अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर हवे असते. आधी हे फीचर केवळ प्रीमियम इयरबड्समध्ये मिळत असे. मात्र, आता कंपन्या बजेट इयरबड्समध्ये देखील हे फीचर देत आहेत. आम्ही तुम्हाला कमी किंमतीत अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचरसह येणाऱ्या इयरबड्सची माहिती देत आहोत. कमी किंमतीत तुम्हाला Realme Buds Q2, Oppo Enco W51, Realme Buds Air Pro, Realme Buds Air 2, Dizo GoPods, Noise Buds Solo, Boat Airdopes 501 आणि Ptron Basspods 992 सारखे इयरबड्स मिळतील. या इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

५ हजार रुपयांच्या बजेटमधील शानदार इयरबड्स, मिळेल अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर

ग्राहकांकडून True Wireless Earbuds ला मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळत आहे. यामुळे कंपन्या देखील नवनवीन इयरबड्स लाँच करत आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किंमतीत शानदार फीचर्ससह येणारे इयरबड्स लाँच करत आहे. ट्रू वायरलेस इयरबड्समध्ये यूजर्सला अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर हवे असते. आधी हे फीचर केवळ प्रीमियम इयरबड्समध्ये मिळत असे. मात्र, आता कंपन्या बजेट इयरबड्समध्ये देखील हे फीचर देत आहेत. आम्ही तुम्हाला कमी किंमतीत अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचरसह येणाऱ्या इयरबड्सची माहिती देत आहोत. कमी किंमतीत तुम्हाला Realme Buds Q2, Oppo Enco W51, Realme Buds Air Pro, Realme Buds Air 2, Dizo GoPods, Noise Buds Solo, Boat Airdopes 501 आणि Ptron Basspods 992 सारखे इयरबड्स मिळतील. या इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Realme Buds Q2
Realme Buds Q2

Realme Buds Q2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये २५dB पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर देण्यात आले आहे. यात ट्रांसपरेंसी मोड देखील मिळेल, जे यूजर्सला एका क्लिकवर अँबिएंट साउंड ऐकण्यास सक्षम बनवते. यामध्ये कॉलसाठी ड्यूल माइक नॉइस कॅन्सिलेशन दिले आहे. सुरक्षेसाठी वॉटर-रेसिस्टेंट आहे. यामध्ये एकूण २८ तास म्यूझिक प्लेबॅक मिळेल. फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणाऱ्या या इयरबड्सची किंमत २,४९९ रुपये आहे.

Oppo Enco W51
Oppo Enco W51

या इयरबड्समध्ये ब्लूटूथ ५.० दिले आहे. इयरबड्स अँड्राइड आणि आओएस सपोर्ट करतात. यात ७एमएमचे डायनॅमिक ड्राइव्हर देण्यात आले आहे, जे थिक बेस प्रदान करतात. इयरबड्स पाणी आणि घामापासून सुरक्षित राहतात. तसेच, टच कंट्रोलद्वारे कॉल उचलणे, ट्रॅक चेंज करणे आणि वॉल्यूम कंट्रोल करता येईल. इयरबड्सला सिंगल चार्जमध्ये ४ तास वापरू शकता. याची किंमत ४,९९९ रुपये आहे.

Realme Buds Air Pro

या इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. यात गुगल फास्ट पेअर फीचर मिळते. तसेच, रियलमीचे एस१ चिपसेट आणि १०एमएम बेस बूस्ट ड्राइव्हर दिले आहे. इयरबड्समध्ये ३५dB पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळते. इयरबड्सची किंमत ४९९९ रुपये आहे.

Realme Buds Air 2
Realme Buds Air 2

इयरबड्समध्ये आर२ चिपसेट देण्यात आली आहे. यामध्ये टच कंट्रोल सपोर्ट देखील मिळेल. कॉलिंगसाठी ड्यूल माइक नॉइस कॅन्सिलेशन दिले आहे. एएनसी नॉइस रिडक्शन मोड देखील इयरबड्स मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.२ दिले असून, याची रेंज १० मीटरपर्यंत आहे. चार्जिंग केस आणि इयरबड्सला २ तासात चार्ज करू शकता. फक्त इयरबड्स १ तासात चार्ज होतात. तसेच, चार्जिंग पॉड्स आणि इयरबड्सला १० मिनिटं चार्ज करून १२० मिनिटं वापरू शकता. , Closer Black आणि Closer White रंगात येणाऱ्या या इयरबड्सची किंमत ३,२९९ रुपये आहे.

Dizo GoPods
Dizo GoPods

या इयरबड्समध्ये कस्टमाइज्ड आर२ चिपसेट आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशनसाठी दोन मायक्रोफोन देण्यात आले आहे. इयरबड्स ट्रांसपरेंसी मोडसह येतात. यामुळे गाणी ऐकताना अँबिएंट साउंडचा अनुभव मिळेल. इयरबड्स वॉटर रेसिस्टेंट आहे. सिंगल चार्जमध्ये इयरबड्सला ५ तास वापरू शकता. याची किंमत ३,२९९ रुपये आहे.

Noise Buds Solo

इयरबड्समध्ये ट्रिपल माइक फीचरसह अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर दिले आहे. यात स्मार्ट इन-एअर डिटेक्शन दिले आहे यामध्ये म्यूझिक प्ले आणि पॉज होते. सिंगल चार्जमध्ये हे ७ तास टिकतात. इयरबड्सची किंमत ४,९९८ रुपये आहे.

Boat Airdopes 501
Boat Airdopes 501

यामध्ये ३०dB पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळते. यामध्ये अँबिएंट आणि गेमिंग मोड देण्यात आला आहे. यात एअर डिटेक्शन फंक्शनालिटी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये इयरबड्सला ४.५ तास वापरू शकता. इयरबड्सला ३,९९० रुपयात खरेदी करता येईल.

Ptron Basspods 992

Ptron Basspods 992 मध्ये क्वाड माइक आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळते. इयरबड्स वॉटर-रेसिस्टेंट आहे. यात टच कंट्रोल देखील मिळेल. एकदा चार्ज केल्यावर इयरबड्सला २० तास वापरू शकता. याची किंमत १,५९९ रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A70I4z