नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने नुकतेच गुगल ड्राइव्ह आणि iCloud वर सेव्ह होणारे चॅट बॅकअपसाठी एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन जारी केले आहे. म्हणजेच तुम्हाला व्हाट्सअॅप चॅट आता आणखी जास्त सुरक्षित झाली आहे. आता WABetaInfo च्या एका ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी एक नवीन फीचर्सवर काम करीत आहे. याचे नाव व्हाट्सअॅप व्हाइस ट्रान्सक्रिप्शन फीचर (WhatsApp Voice Transcriptions) आहे. जाणून घ्या या फीचरसंबंधी. WhatsApp चे व्हाइस ट्रान्सक्रिप्शन फीचर या व्हाइस ट्रान्सक्रिप्शन फीचरचे काम व्हाट्सअॅप वर पाठवण्यात आलेले व्हाइस मेसेजच्या कॉन्टॅक्टला ट्रान्सक्रिप्ट करण्याची सुविधा देते. साध्या शब्दात व्हाट्सअॅप युजर्सच्या व्हाइस मेसेजला रिडेबल फॉर्मेट मध्ये बदलेल. म्हणजेच तुम्हाला व्हाट्सअॅपवर व्हाइस मेसेजच्या रुपाने जे येते ते टेक्स्ट फॉर्मेट मध्ये बदलून दुसऱ्या सोबत शेयर करू शकाल. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, हे एक ऑप्ट इन फीचर असेल. म्हणजेच जर तुम्ही व्हाट्सअॅपला मेसेज ट्रान्सक्रिप्ट करण्याची परवानगी देता, फीचर त्याचवेळी काम करेन. त्याच प्रमाणे युजर्स कॅमेरा आणि मायक्रोफोनची परमीशन व्हाट्सअॅपला देते. ब्लॉग साइटच्या म्हणण्यानुसार, ट्रान्सक्रिप्शन मिळवण्यासाठी युजर्सचे मेसेज व्हाट्सअॅप किंवा फेसबुकच्या सर्वरवर पाठवले जाणार नाही. हे काम अॅपल करणार आहे. खरं म्हणजे, व्हाट्सअॅप युजर्सच्या व्हाइस मेसेजला ट्रान्सक्रिप्ट केल्याने अॅपलला आपली स्पीच रिकग्निशन टेक्नोलॉजीला जबरदस्त बनवण्यात मदत मिळणार आहे. हे फीचर व्हाट्सअॅपच्या iOS अॅपसाठी डेव्हलेप केले जात आहे. टेक्स्ट अपडेट सोबत बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होणार आहे. अँड्रॉयडसाठी व्हाट्सअॅपचे व्हाइस ट्रान्सक्रिप्शन फीचर कधी पर्यंत उपलब्ध केले जाणार आहे, यासंबंधी अद्याप काहीही बोलले जावू शकत नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/394mLgm