नवी दिल्ली : लोकांना करोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सुरक्षा सल्लागारांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरकार विविध उपक्रम हाती घेत आहे. भारतभरातील टेलिकॉम ऑपरेटर्सनी सार्वजनिक ठिकाणी सावधगिरीबद्दल युजर्सना जागरूक ठेवण्यासाठी 'करोनाव्हायरस' डायलर टोन सुरु केली आहे. तुम्ही देखील ही डायलर टोन नियमित ऐकत असालच. वाचा: यात कोरोनाव्हायरस संसर्ग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी सांगण्यात येते. कित्येक दिवसांपासून ही कॉलर ट्यून ऐकून युजर्स आता अक्षरशः कंटाळले असून बरेच लोक ते थांबवण्याचा मार्ग शोधत आहेत. तुम्ही देखील ही ट्यून थांबवण्याचा मार्ग शोधत असाल तर काही सोप्या टिप्स तुमची मदत करतील. पाहा स्टेप्स करोनाव्हायरस कॉलर ट्यून बंद कशी करावी ?
- एअरटेल आणि व्होडाफोन दोन्ही युजर्सना कोरोनाव्हायरस कॉलर ट्यूनसाठी रद्द करण्याची विनंती पाठवण्यासाठी विशेष क्रमांकाची आवश्यकता आहे.
- यासाठी तुम्हाला फोनच्या डायलरवरून *६४६*२२४# डायल करावे लागेल. एकदा हा नंबर डायल केल्यानंतर, आपल्याला रद्द करण्याची विनंती सबमिट करण्यासाठी कीपॅडवरून "१" दाबावे लागेल.
- जर तुम्ही व्होडाफोन युजर असाल, तर तुम्हाला मजकूर म्हणून रद्द करण्याची विनंती पाठवावी लागेल. तुम्हाला १४४ वर "CANCT" मेसेज पाठवावा लागेल.
- करोनाव्हायरस कॉलर ट्यून रद्द केल्याचे कन्फर्म होईल.
- एअरटेल आणि वोडाफोन प्रमाणे, जिओ युजर्सना करोनाव्हायरस कॉलर ट्यून निष्क्रिय करण्यासाठी एक विशेष नंबर डायल करावा लागेल.
- जर तुम्ही जिओ नंबर वापरत असाल तर "STOP" मेसेज टाईप करा आणि १५५२२३ वर पाठवा.
- करोनाव्हायरस कॉलर ट्यून विनंतीवर प्रक्रिया केली जाईल.
- बीएसएनएल ग्राहकांसाठी, विशेष क्रमांक ५६७०० किंवा ५६९९ आहे.
- कोविड १९ caller कॉलर ट्यून रद्द करण्यासाठी तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही नंबरवर "UNSUB" मेसेज पाठवावा लागेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AhO7eS
