Full Width(True/False)

विवोचा नवा स्मार्टफोन पुढच्या महिन्यात येतोय, १० हजारात मिळतील जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः विवो सद्या भारतात आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. फोनला कंपनी विवो Y20A चे अपग्रेडेड व्हर्जन म्हणून लाँच करणार आहे. ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्ट नुसार विवोचा हा स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात ऑक्टोबर मध्ये लाँच करणार आहे. फोनमध्ये कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट ऑफर करू शकते. जाणून घ्या सविस्तर. विवो Y21A मध्ये मिळू शकते हे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये कंपनी 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस IPS LCD पॅनल ऑफर करू शकते. फोनमध्ये मिळणारा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच आणि स्लीम बेजल्स सोबत येईल. बायोमेट्रिक सिक्योरिटी साठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा मिळेल. अफवेच्या माहितीनुसार, विवोचा हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येईल. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून कंपनी स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट ऑफर करू शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा दिला जावू शकतो. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश असल्याची शक्यता आहे. सेल्फी साठी कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करू शकतो. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्रॉयड ओएस सोबत येवू शकतो. कनेक्टिविटीसाठी कंपनी यात वाय फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, ३.५ हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट ऑफर करू शकते. फोनची किंमत १० हजार रुपयाच्या जवळपास असू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CfqbJA