नवी दिल्ली : आपल्या Google Pay मध्ये सुधारणा करत आहे. गुगलने यूजर्सला () सुविधा प्रदान करण्यासाठी एका स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी केली आहे. यामुळे आता तुम्हाला वेगळे बँक अकाउंट न खोलता थेट गुगल पे द्वारे एफडी करता येईल. वाचाः FD वर मिळेल ६.३५% व्याज दर ही एफडी सेवा काही दिवसांपूर्वीच देशात सुरु करण्यात आली आहे. गुगलने चेन्नई येथील बँकेसोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून, यूजर्सला विना बँक अकाउंट एफडी बेनिफिट्स घेता येईल. यूजर्स गुगल पे वर एफडी करू शकतात व वर्षाला ६.३५ टक्के व्याज मिळेल. Equitas SFB चे म्हणणे आहे की, ते फिनटेक इंफ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सेतुद्वारे तयार करण्यात आलेल्या APIs द्वारे डिजिटल एफडी सर्व्हिस उपलब्ध करेल. गुगलसोबत भागीदारी करत बँक गुगल पे अ‍ॅपद्वारे देशभरात सर्व्हिस देईल. Google Pay वर FD कशी कराल? गुगल पे वर एफडी करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅपच्या बिझनेस अँड बिल्स सेक्शन अंतर्गत इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शोधावी लागेल. त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुगल पे यूपीआयचा वापर करून एफडीसाठी पेमेंट करता येईल. एफडी केल्यानंतर थेट गुगल पे अ‍ॅपच्या माध्यमातून ट्रॅक करता येईल. तसेच, अ‍ॅपचा वापर करून एफडी केल्यानंतर ते ट्रॅकिंग पेजवर दिसेल. Equitas SFB ने म्हटले आहे की, एफडीच्या मॅच्योरिटीनंतर रक्कम गुगल पे शी लिंक असलेल्या ग्राहकांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. तसेच, ट्रॅकिंग पेजवरून वेळेच्या आधी एफडी काढू शकता. अशा स्थितीमध्ये यूजर्सच्या विनंतीनंतर त्यात दिवशी बँक खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती Equitas SFB ने दिली. वाचाः वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tsZApm