नवी दिल्ली : कोरोना काळात आपल्या जीवनात अनेक बदल झाले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा बदल म्हणजे व्यवहाराच्या पद्धती. यात प्रामुख्याने पेमेंटची पद्धत देखील बदलली आहे. आता लोक डिजिटल करण्यात जास्त विश्वास ठेवतात. डिजिटल पेमेंटसाठी देशात गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला जातो. पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे UPI पिन. जर तुम्ही हा पिन विसरलात तर मात्र पेमेंट करणे कठीण होते. जर तुम्ही तुमच्या Google Pay चा UPI पिन सारखा विसरता. तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला हा पिन बदलायचा त्याविषयी सांगत आहो. पाहा डिटेल्स. वाचा: Google Pay UPI पिन कसा बदलायचा ? Google Pay मध्ये UPI पिन बदलण्यासाठी, सर्वप्रथम अॅप उघडा. यानंतर वरच्या उजव्या कोपर्यात तुमच्या फोटोवर क्लिक करा. आता इथे तुम्हाला बँक खात्याचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. आता येथे बँक खाते निवडा ज्यासाठी तुम्हाला पिन बदलायचा आहे. हे केल्यानंतर, UPI पिन विसरलात वर टॅप करा. तुमच्या डेबिट कार्डाच्या एक्सपायरी डेटसह शेवटचे सहा अंक टाका. तुम्ही आता येथे नवीन UPI पिन तयार करू शकता. तुम्हाला एक OTP मिळेल. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही एक नवीन पिन जेनरेट करू शकाल. Gogle Pay वर एफडी कसा बनवायचा? मुदत ठेव करण्यासाठी, Google Play अॅप उघडा आणि खाली व्यवसाय आणि बिल पर्याय निवडा. यानंतर 'इक्विटास एसएफबी' लोगो निवडा आणि नंतर इक्विटास शोधा. यानंतर, सेतुची इक्विटास स्मॉल फायनान्स बँक तुमच्या समोर लिहिली जाईल. त्यानंतर Get Started पर्यायावर क्लिक करा. यानंतर, 2 मिनिटात ओपन एफडी लिहिलेले दिसेल. त्या खाली 'Invest Now' वर क्लिक करा. आता तुम्हाला मुदत ठेवीचे सर्व पर्याय उघडता येतील. FD वर क्लिक करा. यानंतर मुदत ठेवीची रक्कम आणि व्याज दर निश्चित करा. केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पिन कोड सारखे सर्व तपशील भरा आणि ते सबमिट करा. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A4ORE2