Full Width(True/False)

लाँचआधीच बहुप्रतिक्षित Google Pixel 6 सीरिजच्या किंमतीचा खुलासा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : अपकमिंग Pixel 6 सीरिजबाबत अनेक माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सीरिज अंतर्गत पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रो स्मार्टफोन्सला सादर केले जाईल. आता समोर आलेल्या नवीन रिपोर्टनुसार, या फोन्सची सुरुवाती किंमत जवळपास ५६ हजार रुपये असू शकते. वाचा: एका युट्यूब चॅनेलवर Pixel 6 आणि Pixel 6 Pro ला कोडनेमसह इन्वेंट्री लिस्टमध्ये पाहण्यात आल्याची माहिती दिली आहे. यात तीन फोन्स असून, यांचे कोडनेम Oriole Fog, Oriole Carbon आणि Raven आहे. पहिली दोन नावे ही पिक्सल ६ च्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची आहे. Raven कोडनेम Pixel 6 Pro चे आहे. तर Fog आणि Carbon या डिव्हाइसच्या रंगाचे नाव असू शकते. कलप पर्यायांबद्दल सांगायचे तर पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रो ला वेगवेगळ्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल. याआधीच्या रिपोर्टमध्ये समोर आले होते की, या फोन्सला सर्व रंगात जगभरातील बाजारात उपलब्ध केले जाणार नाही. काही देशात ठराविक रंगातच फोन उपलब्ध होईल. किंमतीबद्दल सांगायचे तर Pixel 6 Pro च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवाती किंमत ७८,००० रुपये असू शकते. फोनला तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल. याचे बाकी व्हेरिएंट २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजमध्ये येतील. सीरिजमधील फोन्सची सुरुवाती किंमत ५६,००० रुपये असू शकते. फीचर्सबद्दल सांगायचे तर पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रो मध्ये आधीपेक्षा जास्त रॅम दिली जाईल. यात ६.७ इंच QHD डिस्प्ले दिला जाईल. डिव्हाइस ३३ वॉट चार्जिंग सपोर्टसह येईल. सोबतच ४एक्स टेलिफोटो कॅमेरा दिला जाईल. या सीरिजला १९ ऑक्टोबरला लाँच केले जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uucunl