Full Width(True/False)

सिद्धूने दिला राजीनामा, तर अर्चना पूरन सिंगची खुर्ची हलली!

मुंबई : माजी क्रिकेटपटू यांनी पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकीकडे पंजाबच्या राजकारणात भूकंप आला, तर दुसरीकडे सिद्धूच्या पुन्हा छोट्या पडद्याकडे वळण्याच्या सोशल मीडियावर उठलेल्या वावड्यांमुळे काही कलाकारांच्या चिंतेत भर पडली आहे. नक्की कोणाची चिंता वाढली आहे, जाणून घेऊ. यांची नोकरी संकटात! सिद्धू यांच्या राजकीय पक्षाच्या पदावरुन राजीनामा देण्यानंतर सोशल मीडियावर अर्चना पूरन सिंग यांच्यावर मीम तयार करुन ते शेअर करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर युझर्स म्हणताहेत की, आता नवज्योत सिंग सिद्धूच्या राजीनाम्यामुळे अर्चना पूरन सिंग यांची नोकरी संकटात आहे. शोमध्ये सिद्धूंच्या जागी अर्चना पूरन सिंग यांना मिळाली होती संधी अर्चना यांनी '' मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांची जागा घेतली होती. सिद्धू हे कपिल शर्मासोबत त्याच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' पासून काम करत होते. त्यांनी 'द कपिल शर्मा शो' मध्येही जज म्हणून खूर्ची सांभाळली होती. मात्र त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी जेव्हा शो सोडला, तेव्हा त्यांच्या जागेवर निर्मात्यांनी अर्चना पूरन सिंग यांना संधी दिली होती. सिद्धू यांच्या राजीनाम्याने अर्चना पूरन सिंग प्रचंड ट्रेंड! अर्चना वर्ष २०१९ पासून 'द कपिल शर्मा शो' मध्ये काम करत आहेत. मात्र सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर आता सोशल मीडियावर अर्चना चांगल्याच ट्रेंड होत आहे. त्यांच्यावर बनवण्यात आलेले मीम्स सध्या खूपच व्हायरल होत आहेत. अर्चना यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर तयार करण्यात आलेले मीम्स त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवरून शेअर करत म्हटले की, 'गोष्ट खुर्चीची.' सिद्धू अध्यक्ष झाल्यानंतर अर्चना यांना मिळाल्या होत्या शुभेच्छा! 'कपिल शर्मा शो' च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अर्चना यांनी सिद्धूच्या पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडीनंतर स्वतःशी जोडलेला एक मजेदार किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा सिद्धूंकडे पंजाब कॉंग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तेव्हा लोकांनी त्यांना पुष्पगुच्छ व शुभेच्छा पाठवायला सुरुवात केली होती. अर्चना यांनी हे देखील म्हटले की, 'मला खूप सारे पुष्पगुच्छ आले होते, त्यात म्हटले होते की, ते (नवज्योत सिद्धू) तिकडे व्यग्र झाले, त्यामुळे अर्चना मॅम तुम्हाला शुभेच्छा.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kVllvf