Full Width(True/False)

iPhone 13 च्या लाँचिंगनंतर iPhone 11 झाला स्वस्त, पहिल्यांदाच 'इतक्या' खाली किंमत, पाहा

नवी दिल्लीः अॅपल कंपनीने आपली नवीन सीरीज लाँच केली आहे. आयफोन १३ च्या लाँचिंग नंतर iPhone 11 खरेदी करणे स्वस्त झाले आहे. भारतात आयफोन ११ आणि आयफोन १२ सीरीजच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आयफोन १२ ची सुरुवातीची किंमत ६५ हजार ९०० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ ची अधिकृत किंमत पहिल्यांदाच ५० हजारांच्या खाली आली आहे. आयफोन ११ च्या ६४ जीबीची भारतात किंमत आता ४९ हजार ९०० रुपये आणि १२८ जीबी स्टोरेजच्या आयफोनची किंमत ५४ हजार ९०० रुपये झाली आहे. आयफोन ११ ला भारतात ६४ हजार ५०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. ग्राहकाकडे जुन्या फोनला ट्रेड इन करून ४६ हजार १२० रुपयाची सूट मिळते. नवीन किमतीला कंपनीच्या वेबसाइटवर पाहिले जावू शकते. आयफोन ११ च्या फीचर्स मध्ये या फोनमध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले सोबत येतो. यात ए १३ बायोनिक प्रोसेसर दिले आहे. हे खूपच पॉपरफुल प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी आयफोन ११ च्या रियर मध्ये १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहेत. हे वाइड अँगल आणि अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. आयफोन ११ मध्ये कनेक्टिविटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट, स्पॅशियल ऑडियो आणि डॉल्बी एटमॉस चा सपोर्ट मिळतो. हे लाइटनिंग पोर्ट सोबत येते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hzauF0