Full Width(True/False)

Tv ला अधिक स्मार्ट बनविण्याकरिता रियलमी नवीन डिव्हाइस आणण्याच्या तयारीत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Realme कंपनीने गेल्या वर्षीच्या ५५ इंच मॉडेलच्या साउंडबारसह चार टेलिव्हिजन लाँच केले असून आता, Realme लवकरच टीव्ही स्मार्ट बनवण्यासाठी एक परवडणारे उपकरण आणू शकते. एका डेडिकेटेड वेबपेजवर, फ्लिपकार्टने आगामी प्रोडक्ट्सना टीझ केले असून ए डिव्हाइस भारतात सणासुदीच्या काळात सुरू होणाऱ्या वार्षिक विक्री महोत्सवाचे आकर्षण ठरेल. स्टिक म्हणून हे नवे डिव्हाइस लाँच करण्यात येणार असून ते फायर टीव्ही स्टिकसारखे दिसेल. रिअलमीच्या स्ट्रीमिंग स्टिकसाठी भारत ही पहिलीच बाजारपेठ असल्याचेही सांगण्यात येत आहे. वाचा: या टीझरमधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे "गुगल टीव्ही". Google ने गेल्या वर्षी आपल्या Android- समर्थित उपकरणांसाठी नवीन Chromecast सह नवीन इंटरफेस लाँच केले, परंतु केवळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, स्पेन आणि यूके सारख्या निवडक बाजारांसाठी. Google ने अद्याप भारताबद्दल काहीही सांगितले नाही, त्यामुळे रिअलमीला येथे पहिले गुगल टीव्ही डिव्हाइस म्हणता येईल आहे. ,फ्लिपकार्ट टीझरने रियलमी टीव्ही स्टिकला "भारतात प्रथमच" असेही म्हटले आहे. Google अनेक टीव्हीसाठी अधिकृतपणे Google TV भारतात लाँच करू शकते. Realme, Xiaomi आणि OnePlus सारख्या ब्रँडच्या अँड्रॉईड टीव्हीवर चालणाऱ्या TV ना येत्या आठवड्यात गुगल टीव्ही इंटरफेस मिळू शकेल. फेब्रुवारीमध्ये, गूगलने घोषणा केली की, अँड्रॉइड टीव्ही चे गुगल टीव्ही फेसलिफ्ट त्याच देशांमध्ये सुरू झाले आहे जिथे नवीन क्रोमकास्ट उपलब्ध आहे. तसेच "Google TV" या शब्दाचा वापर करून अनेक अँड्रॉइड टीव्हीवर चालणारे अनेक टेलिव्हिजन सेट मार्केटिंग करतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EgRvcd