Full Width(True/False)

नवीन काहीच नाही! जुन्या मॉडेल्सप्रमाणेच मिळतात iPhone 13 सीरिजमध्ये फीचर्स, पाहा काय आहे खास?

नवी दिल्ली : ने आपल्या नवीन सीरिजला लाँच केले आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने , iPhone 13, आणि ला सादर केले आहे. ट्विटरवर देखील #iPhone13 हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग आहे. कंपनीने चारही फोन्सच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे, कंपनीने १३ बाबत जास्त खुलासा केलेला नाही. या फोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Apple iPhone 13 आणि iPhone 13 Mini आयफोन १३ आणि आयफोन १३ मिनीचे डिझाइन आयफोन १२ सारखेच आहे. आयफोन १३ मध्ये ६.१ इंच आणि १३ मिनीमध्ये ५.४ इंच डिस्प्ले दिला आहे. नवीन आयफोनमध्ये कंपनीने ए१५ बायोनिक चिप दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे ५० टक्के अधिक फास्ट आहे. फोनमध्ये ट्विन रियर कॅमेरा दिला आहे. फोन आयपीएस६८ रेटिंगसोबत येतो. फोनला पिंक, ब्लू, मिडनाइट, स्टारलाइट आणि प्रोडक्ट रेड रंगात सादर करण्यात आले आहे. आयफोन १२ प्रो मॅक्समध्ये दिलेले सेंसर शिफ्ट ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आयफोन १३ आणि आयफोन १३ मिनीमध्ये मिळेल. सोबतच, ड्यूल कॅमेरा सेटअपमध्ये १२ मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. Apple iPhone 13 आणि iPhone 13 Mini ची किंमत iPhone 13 Mini ची बॅटरी आयफोन १२ मिनीच्या तुलनेत १.५ तास अधिक टिकेल. तर आयफोन १३ ची बॅटरी आयफोन १२ च्या तुलनेत २.५ तास अधिक चालेल. आयफोन १३ मिनीची किंमत ६९९ डॉलर्सपासून (जवळपास ५१,४७३ रुपये) सुरू होते. तर आयफोन १३ ची अमेरिकेत किंमत ७९९ डॉलर्सपासून (५८,८३६ रुपये) सुरु होते. दोन्ही फोनचे सुरुवाती व्हेरिएंट १२८ जीबी स्टोरेजचे आहे. Apple iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max आयफोन १३ प्रो मध्ये ६.१ इंच स्क्रीन दिली आहे. एवढीच स्क्रीन आयफोन १२ प्रो मध्ये मिळते. तर आयफोन १३ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंच स्क्रीन दिली आहे. नवीन आयफोनमध्ये कंपनीची ए१५ बायोनिक चिप मिळेल. हा फोन आयपीएस६८ रेटिंगसह येतो. म्हणजे पाणी व धुळीमुळे खराब होणार नाही. फोनमध्ये ट्रिपल रियर सेटअप दिला आहेय ३एक्स ऑप्टिकल झूमसोबत ७७एमएम टेलिफोटो लेंस, मॅक्रो फोटोग्राफीसाठी एफ/१.८ अपर्चरसह अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, आतापर्यंतचा सर्वात मोठा सेंसर एफ/१.५ वाइड अँगल लेंस मिळेल. iPhone 13 Pro ची बॅटरी आयफोन १२ प्रो च्या तुलनेत १.५ तास अधिक टिकेल. तर आयफोन १३ प्रो मॅक्सची बॅटरी आयफोन १२ प्रो मॅक्सच्या तुलनेत २.५ तास अधिक चालेल. आयफोन १३ प्रो ची सुरुवाती किंमत ९९९ डॉलर्स (७३,५५९ रुपये) असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hzoUVQ