मुंबई- करोना महामारीमुळे सिनेमागृह बंद होती. अनेक सार्वजनिक ठिकाणं सुरू करण्यात आली तरी सिनेमागृह उघडी करण्यात आली नव्हती. बॉलिवूड आणि मराठी कलाकारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्याच्या वृत्तानंतर निर्मात्यांनी दोन दिवसांत १८ सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच अवघ्या दोन दिवसांमधअये इतक्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इथे पाहा चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची यादी-
सिनेमांचे नाव प्रदर्शनाची तारीख स्टार कास्ट
सूर्यवंशी दिवाळी, २०२१ अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, अजय देवगन
बंटी और बबली २ १९ नोव्हेंबर, २०२१ सैफ अली खान, रानी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी
सत्यमेव जयते २ २६ नोव्हेंबर, २०२१ जॉन अब्राहम, दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, नोरा फतेही, अमायरा दस्तूर
जर्सी १ डिसेंबर, २०२१ शाहिद कपूर, मृणाल ठाकुर, पंकज कपूर
तडप ३ डिसेंबर, २०२१ अहान शेट्टी, तारा सुतारिया
चंडीगढ़ करे आशिकी १० डिसेंबर, २०२१ आयुष्मान खुराना, वाणी कपूर
८३ २४ डिसेंबर, २०२१ रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, बोमन ईरानी, पंकज त्रिपाठी
पृथ्वीराज २१ जानेवारी, २०२२ अक्षय कुमार, सोनू सूद, मानुषी छिल्लर
लाल सिंह चड्डा व्हॅलेन्टाइन डे, २०२२ आमिर खान, करिना कपूर, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव वीजे
जयेशभाई जोरदार २५ फेब्रुवारी, २०२२ रणवीर सिंग, शालिनी पांडे
बच्चन पांडे ४ मार्च, २०२२ अक्षय कुमार, क्रिती सेनॉन, जॅकलीन फर्नांडिस
शमशेरा १८ मार्च, २०२२ रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त
भूल भूलैया २ २५ मार्च, २०२२ कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी
केजीएफ २ १४ एप्रिल, २०२२ यश, संजय दत्त, प्रकाश राज, मालविका अविनाश, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी
मेडे २९ एप्रिल, २०२२ अजय देवगन, अमिताभ बच्चन, रकुलप्रीत सिंग
हीरोपंती २ ६ मे, २०२२ टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, क्रिती सेनॉन
रक्षा बंधन ११ ऑगस्ट, २०२२ अक्षय कुमार, भूमी पेडनेकर
राम सेतु दिवाळी, २०२२ अक्षय कुमार, नुसरत भरूचा, जॅकलीन फर्नांडीस


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m0Zge0