नवी दिल्लीः मोबाइल फोनवर अनेक लोक चांगलाच खर्च करीत आहेत. त्यामुळे त्यांना कमी किंमतीती जास्त फायदे देणारे प्लान्स हवे असतात. देशातील सर्व टेलिकॉम कंपन्या लोकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान आणत आहेत. आज आम्ही या ठिकाणी अशाच काही प्रीपेड प्लान्सची माहिती देत आहोत. या प्लानची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स मिळतात. जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi च्या या प्रीपेड प्लान्ससंबंधी. रिलायन्स जिओचा २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान कंपनी देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी बनली आहे. जर २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्रीपेड प्लान्स हवे असतील तर आपल्या ग्राहकांसाठी कंपनी दोन प्लान ऑफर करते. १४९ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस आणि १ जीबी डेटा रोज मिळतो. हा प्लान २४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये तुम्हाला जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. दुसरा प्लान हा २८ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. यात तुम्हाला १९९ रुपयात रोज १.५ जीबी डेटा, रोज १०० एसएसएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. एअरटेलच्या प्रीपेड प्लान्सची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी एअरटेलच्या युजर्संला २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्लान खरेदीची संधी आहे. पहिला प्लान हा १४९ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसाची वैधता, २ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. स्ट्रीमिंग बेनेफिट्स मध्ये तुम्हाला एअरटेल एक्स स्ट्रीम आणि विंक म्यूझिकचे अॅक्सेस मिळते. तसेच अमेझॉन प्राइम अॅपचे फ्री ट्रायल मिळते. एअरटेलच्या दुसऱ्या प्लानमध्ये ३०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबत २ लाखांपर्यंत भारतीय अॅक्सा लाइफ इंश्यूरेन्स, विंक म्यूझिक अॅपचे अॅक्सेस तसेच ३० दिवसांसाठी अमेझॉन प्राइमचे फ्री अॅक्सेस मिळते. या प्लानची किंमत १७९ रुपये आहे. Vi चे प्रीपेड प्लान्स कंपनीकडे अनेक प्रीपेड प्लान्स आहेत. ज्यात युजर्संना कमी किंमतीत जास्त फायदे मिळतात. हा कंपनीचा जिओप्रमाणे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्रीपेड प्लान ऑफर करते. पहिल्या प्लानची किंमत १४८ रुपये आहे. ज्यात तुम्हाला १८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि रोज १ जीबी इंटरनेट मिळेल. दुसऱ्या प्लानची किंमत १४९ रुपये आहे. २८ दिवसाच्या वैधतेसोबत एकूण ३ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. सोबत या प्लानला कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी केल्यास १ जीबी डेटा फ्री मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AMEkgX