नवी दिल्लीः फेस्टिव सीजन डोळ्यासमोर ठेवून Amazon आणि Flipkart ने यावर्षीच्या फ्लॅगशीप सेलची घोषणा केली आहे. सेल ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. आधी कंपनीने हा सेल ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, कंपनीने नंतर यात बदल केला आहे. आता हा सेल ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. अमेझॉनचा Great Indian Festival 2021 सेल एक महिना पर्यंत चालणार आहे. वाचा: या सेलमध्ये ग्राहकांना मोबाइल, लॅपटॉप्स, टॅबलेट्स, अॅक्सेसरीज, हेडफोन्स, स्पीकर्स आणि दुसऱ्या प्रोडक्ट्सला ऑफर मध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अमेझॉनने Great Indian Festival 2021 सेलसाठी मायक्रोसाइट बनवली आहे. या सेलमधून मिळणाऱ्या काही डील्स संबंधी माहिती समोर आली आहे. या सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन सोबत १० टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हेही सांगितले की, इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान, प्राइम मेंबर्स १५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सेव्हिंग करू शकतील. वाचा: सेलआधी कंपनी नवीन डील्स संबंधी माहिती सांगणार आहेत. याआधी कंपनी नवीन नवीन डील्ससंबंधी माहिती देत आहे. या सेलमध्ये वनप्लसच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जाणार आहे. वनप्लस ९ ५जी ला या सेलमध्ये ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकला जाणार आहे. याची स्टिकर किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. त्यामुळे जर याला ३९ हजार ९९९ रुपयांत विकले जात असेल तर यावर १० हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. वनप्लस ९ प्रो ला या सेलमध्ये खूपच स्वस्त किंमतीत विकले जाणार आहे. स्मार्टफोनला १४ हजार ९९९ मध्ये लिस्ट करण्यात आले आहे. ओरिजनल किंमत ६४ हजार ९९९ रुपये आहे. म्हणजेच यावर कमीत कमी १५ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EVv8t1