नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने काही दिवसांपूर्वी आपला एक बजेट स्मार्टफोन लाँच केला. या फोनचे नाव आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनला पहिल्या सेलमध्ये आज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट Realme.com वर उपलब्ध करण्यात येणार आहे. आज दुपारी १२ वाजेपासून या फोनला खरेदी करू शकता. Realme C25Y ची किंमत या फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन केवळ एकाच व्हेरियंट मध्ये येतो. फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या ऑफर्समध्ये फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जाणार आहे. आपला जुना फोन एक्सचेंज केल्यास ११ हजार २०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जाणार आहे. तुम्हाला जर हा फोन ईएमआय वर खरेदी करायचा असेल तर फक्त दर महिना ४१६ रुपये देवून हा फोन घरी नेता येईल. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. Realme C25Y चे फीचर्स हा फोन ड्युअल सिमवर काम करतो. हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित Realme R Edition वर काम करतो. यात ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 720x1600 आहे. या फोन मध्ये Unisoc T610 SoC प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर ५० मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. तिसरा २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3COIq98