नवी दिल्ली: फ्लिपकार्ट कार्निवल सेलमध्ये सध्या आणि वर मोठी सूट देण्यात येत आहे.२ सप्टेंबरपासून हि विक्री सुरू झाली असून यामध्ये Realme X7 Pro वर ३,००० रुपयांची सूट दिली जात आहे. Realme X7 Pro सोबत, Realme X7 च्या हाय-एंड मॉडेल्सवर सूट देखील दिली जात आहे. Realme X7 चे ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट या सेलमध्ये १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वाचा: लो-एंड मॉडेलवर मात्र कोणतीही सूट नाही. ग्राहक १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफचा लाभ देखील घेऊ शकतात. Realme X7 चे टॉप मॉडेल २१,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. या सेलमध्ये कंपनी त्यावर २,००० रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच तुम्ही हे मॉडेल १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Realme X7 Pro २९,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला असून सेलमध्ये हा स्मार्टफोन २६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही सवलत ८ GB रॅम आणि१२८ GB स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर ३,००० रुपयांची सूट दिली जात आहे. Realme X7 Pro मध्ये १२० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. ८ GB रॅम असलेल्या फोनमध्ये MediaTek Dimensity १००० + 5G चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा समोर देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये ६५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० mAh ची बॅटरी देखील आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38MwR5j