नवी दिल्लीः नेहमी आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी करीत असते. फेसबुकची मालकी असलल्या या मेसेजिंग अॅपमध्ये Android आणि iOS या दरम्यान चॅट हिस्ट्री ट्रान्सफर फीचरला जारी केले आहे. याशिवाय, काही नवीन फीचर्सची झलक पाहायला मिळत आहे. लवकरच युजर्संना व्हाट्सअॅप वर मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अपकमिंग फीचर्स संबंधी माहिती देत आहोत. १. मेसेज रिअॅक्शन फीचर व्हॉट्सअॅपवर लवकरच इंस्टाग्राम सारखे मेसेज रिअॅक्शन फीचर मिळणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, कंपनी अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हींसाठी या फीचरवर काम करीत आहे. फीचर द्वारे युजर्स मेसेजवर रिअॅक्शन इमोजी द्वारे आपल्या प्रतिक्रिया देवू शकतील. ही सुविधा ग्रुप चॅट आणि पर्सनल चॅट दोन्हीसाठी मिळणार आहे. २. iOS साठी नवीन चॅट डिझाइन नवीन व्हाट्सअॅप वेब फीचर शिवाय, कंपनी अॅपल युजर्ससाठी चॅट बबल फीचरची टेस्टिंग करीत आहे. नवी डिझाइन आधी Android यूजर्स साठी बीटा अॅप मध्ये उपलब्ध आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार, फीचरला लवकरच iOS वर आणले जाणार आहे. याशिवाय, व्हाट्सअॅप बीटा व्हर्जन 2.21.13.2 वर मोठी चॅट बबल आणि नवीन बॅकग्राउंड कलर डिझाइन मिळू शकतो. ३. मल्टी डिव्हाइस मध्ये आले नवीन आर्काइव युजर्संसाठी आणखी एक फीचर रोलआउट करण्याची शक्यता आहे. हे नवीन Archive आहे. WABetaInfo ने सांगितले की, व्हाट्सअॅप ने एक नवीन आर्काइव जारी केले आहे. ज्यावेळी मल्टी डिव्हाइस फीचरचा वापर कराल त्यावेळी ते उपलब्ध होईल. हे फीचर सध्या बीटा फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ याला लवकरच स्टेबल व्हर्जन मध्ये रिलीज केले जाणार आहे. ४. व्हाट्सअॅप वर रिपोर्ट कंपनी एक नवीन सिक्योरिटी फीचर जारी करणार आहे. या अंतर्गत तुम्ही कोणत्याही व्यक्तीला व्हाट्सअॅप रिपोर्ट करू शकता. या व्यक्ती सोबत तुमच्या चॅटचे अखेरचे ५ मेसेज पुरावा म्हणून द्यावे लागतील. व्हाट्सअॅपचे हे फीचर अँड्रॉयड 2.21.18.10 अपडेटसाठी बीटा मध्ये पाहिले गेले होते. वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38Ix2OT