नवी दिल्ली: आणि हे दोन्ही फोन आज ,९ सप्टेंबर रोजी Realme Virtual Launch Event मध्ये लाँच करण्यात येणार असून कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग ( IST) दुपारी १२.३० वाजता सुरु होईल. अशात , Realme 8i आणि Realme 8s 5G स्मार्टफोनची अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये समोर आली आहे , ज्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, दोन्ही फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच, दोन्ही फोन ट्रिपल रियर कॅमेरासह सुसज्ज असतील. पाहा डिटेल्स. वाचा: Realme 8i ची संभाव्य वैशिष्ट्ये: ट्विटरद्वारे, Realme आणि MediaTek ने कन्फर्म केले होते की, MediaTek Helio G९६ प्रोसेसर Realme 8i मध्ये दिला जाईल. या प्रोसेसरला 4G सपोर्ट असेल. तसेच, हा फोन ६.५९ इंचाच्या फुल-एचडी + डिस्प्ले आणि १२० Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकते. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्याचे प्राथमिक सेन्सर ५० मेगापिक्सेलचे असेल. इतर दोन सेन्सर्सची माहिती देण्यात आलेली नाही. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच, फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात येऊ शकते. यात ३.५ मिमी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि स्पेक ग्रिल असेल. तसेच, साइड माऊंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील यात दिले जाऊ शकते. Realme 8s 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये: Realme 8s 5G मध्ये MediaTek Helio ८१० प्रोसेसर दिला जाईल. फोन ही मीडियाटेक ८०० ची सुधारित आवृत्ती असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच, हा फोन ६.५ इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकतो. हे डिव्हाईस ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येईल . फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम दिली जाऊ शकते. ज्याचे स्टोरेज ५ जीबी रॅम पर्यंत वाढवता येईल . त्याचबरोबर १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज देखील यात दिले जाऊ शकते. फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपने देखील सुसज्ज असण्याची शक्यता आहे. ज्याचे प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेलचे असेल . इतर दोन सेन्सर्सची माहिती देण्यात आलेली नाही. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार असून फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देणे अपेक्षित आहे. जी दोन ३३ W Dart फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hgcUIx