नवी दिल्ली : लहान स्क्रीनवर चित्रपट अथवा वेब सीरिज पाहण्याचा आनंद मिळत नसेल व नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ने भारतीय ग्राहकांसाठी नवीन 55 inch iFFalcon K72 4K लाँच केला आहे. टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यात डॉल्बी एटमॉससह डॉल्बी व्हिजन, ड्यूल बँड वाय-फाय, बिल्ट-इन क्रोमकास्ट, गुगल असिस्टेंट आणि स्मूथ व्हिज्यूअलसाठी मोशन एस्टिमेशन आणि मोशन कंपेसेशन टेक्नोलॉजी मिळते. या टीव्हीचे फीचर्स आणि किंमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: 55 inch iFFalcon TV चे फीचर्स हा डॉल्बी एटमॉस आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह करतो. हा अँड्राइड टीव्ही ११ वर काम करतो. याशिवाय टीव्हीचे सर्वात मोठे वैशिष्ट्यं म्हणजे व्हीडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला एक्सटर्नल कॅमेरा देण्यात आला आहे. टीव्ही एचडीआर १० फॉर्मेट सपोर्ट करतो. स्मूथ व्हिज्यूअलसाठी MEMC देण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, गेमर्ससाठी लॅग-फ्री आणि ब्लर-फ्री व्हिज्यूअल मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३ एचडीएमआय २.१ पोर्ट् , २ यूएसबी पोर्ट्स आणि एक एथरनेट पोर्ट, SPDIF पोर्ट आणि ब्लूटूथ मिळेल. याशिवाय ड्यूल बँड वाय-फाय २.४ GHz आणि ५ GHz बँड्स दोन्हीही सपोर्ट दिला आहे. टीव्हीमध्ये , Disney+ Hostar आणि YouTube सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. इतर अ‍ॅप्स देखील तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. यूजर्सला रिमोटवर , Netflix, आणि गुगल असिस्टेंट बटन मिळेल. iFFalcon K72 55 inch 4K TV ची किंमत या टीव्हीची किंमत ५१,९९९ रुपये असून, टीव्ही विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. टीव्ही ब्लॅक रंगात येतो व यावर १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. तुम्ही टीव्ही १,७७८ रुपये सुरुवाती ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. याशिवाय आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआयवर टीव्ही घेतल्यास १,२५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yz8uGd