नवी दिल्लीः रियलमीने जगातील पहिला MediaTek Dimensity 810 प्रोसेसरचा स्मार्टफोन लाँच केला आहे. भारतात आज या फोनचा पहिला सेल होत आहे. फोनला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट द्वारे खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी सारखे फीचर्स दिले आहेत. Realme 8s ची किंमत आणि ऑफर्स Realme 8s स्मार्टफोनला दोन व्हेरियंट ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये आणले आहे. फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. तर हाय एन्ड ८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला पर्पल आणि यूनिव्हर्स ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. लाँचिंग ऑफर मध्ये या फोनवर इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहक ICICI बँक क्रेडिट कार्ट ईएमआय ट्रान्झॅक्शन आणि HDFC बँक क्रेडिट, डेबिट कार्डवर १५०० रुपयाचा डिस्काउंट मिळवू शकतात. म्हणजेच हा फोन १५ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. Realme 8s 5G चे फीचर्स हा फोन अँड्रॉयड ११ आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (1080 x 2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. जो ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. यात सिक्योरिटीसाठी एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोन MediaTek डाइमेंशन 810 प्रोसेसर सोबत ८ जीबी रॅम पर्यंत आणि १२८ जीबी पर्यंतच्या स्टोरेज पर्यंत येतो. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी स्लॉट द्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकते. यात ५ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. रियर कॅमेरात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर आमि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. याशिवाय, ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते. कनेक्टिविटी फीचर मध्ये 5G, 4G VoLTE, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ वी5.1, जीपीएस/ ए-जीपीएस आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Xb3xDr