नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर HMD ग्लोबल एका नवीन डिवाइस वर काम करीत आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या नोकिया मोबाइल इंस्टाग्राम अकाउंटने चुकून या फोनची डिटेल्स पब्लिश केली होती. कंपनीची जी सीरीज अंतर्गत Nokia G10 आणि Nokia G20 डिव्हाइस येत होते. नवीन फोनध्ये कंपनी पंच होल कटआउट च्या जागी वॉटरड्रॉप नॉच देवू शकते. लाँच आधीच या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइन ऑनलाइन लीक झाली आहेत. Nokia G50 संबंधित नवीन माहिती टिप्स्टर Roland Quandt ने शेअर केली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, अपकमिंग नोकिया जी ५० स्मार्टफोन ५जी कनेक्टिविटी सोबत येईल. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जावू शकतो. नवीन लीक माहितीवरून Nokia G50 मध्ये ६.८२ इंचाचा IPS पॅनेल आहे. जो 720 x 1640 पिक्सलचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येईल. याआधी आलेल्या टीझर मध्ये Nokia G50 ला मिडनाइट सन कलर ऑप्शन मध्ये पाहिले जावू शकते. बजेट स्मार्टफोन असेल Nokia G50 Nokia G50 एक बजेट स्मार्टफोन असू शकतो. कारण, यात एन्ट्री लेवल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. मागील बाजुस स्मार्टफोनमध्ये सर्कुलर मॉडलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी शूटर मिळू शकतो. फोनचा कॅमेरा 0fps 1080p वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट करणार आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये 4,850mAh ची बॅटरी मिळू शकते. याशिवाय, कंपनी २ वर्षाच्या सॉफ्टवेयर अपग्रेड आणि ३ वर्षाची सिक्योरिटी अपडेट देवू शकते. कनेक्टिविटीसाठी यात वाय फाय ५, ब्लूटूथ ५.०, एनएफसी, एक यूएसबी सी पोर्ट आणि एक ३.५ मिमी ऑडियो जॅक सारखे फीचर्स मिळू शकते. नोकियाच्या या स्मार्टफोनची किंमत २२ हजार ५०० रुपये असू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hnB2cf