नवी दिल्ली : चे नवीन व्हेरिएंट आजपासून (८ सप्टेंबर) विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनच्या रियरला जपानी डिझाइन Naoto Fukasawa द्वारे डिझाइन करण्यात आलेले स्पेशल सुटकेससारखे डिझाइन देण्यात आले आहे. या फोनची टक्कर स्मार्टफोनशी आहे. वाचा: Realme GT Master Edition च्या ६ जीबी + १२८ जीबी एंट्री लेव्हल व्हेरिएंटची आजपासून विक्री सुरू होत आहे. या फोनला फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. फोन वॉयजर ग्रे, लूना व्हाइट आणि कॉसमॉस ब्लॅक रंगात येतो. फ्लिपकार्टवरून प्रीपेड ट्रांझॅक्शनवर फोनला खरेदी केल्यास २ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट मिळेल. तर रियलमीच्या साइटवर एसबीआय कार्ड्स, एचडीएफसी कार्ड्स आणि आयसीआयसीआय कार्ड्सवर २ हजार रुपये सूट मिळेल. Realme GT Master Edition ८ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंट्समध्ये येतो. हे फोन आधीपासूनच खरेदीसाठी उपलब्ध असून, याची किंमत क्रमशः २७,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपये आहे. GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये ३६० हर्ट्ज टच सँपलिंग रेट आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.४३ इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसा आणि व्हीडिओग्राफीसाठी यात रियरला ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यामध्ये २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. पॉवरसाठी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,३०० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l0LAPP