नवी दिल्ली: Samsung ने अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy M32 5G स्मार्टफोन लाँच केला असून हा Samsung चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ 5G बँड देण्यात आले आहेत. Galaxy M32 5G स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून त्यावर २,००० रुपयांची सूट देखील दिली जात आहे. पाहा डिटेल्स. वाचा: : किंमत आणि ऑफर Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनच्या ६GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. मात्र, तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे २००० रुपयांच्या सूटवर फोन खरेदी करू शकता . म्हणजेच, Galaxy M 32 5G स्मार्टफोन १८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल . तसेच, फोनच्या खरेदीवर १४,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनच्या ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. फोन ४८ MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येईल. तसेच सेल्फीसाठी १३ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. एकुणच,फोन ५ कॅमेऱ्यांसह ५००० mAh बॅटरीने सुसज्ज असेल. Samsung Galaxy M32 5G : वैशिष्ट्ये Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनला ६.५ इंच HD + Infinity-V डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये डाइमेंशन ७२० प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित वन यूआय ३.१ वर काम करेल. स्मार्टफोनमध्ये ४८ एमपी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ४८ MP चा असेल. याशिवाय, ८ एमपी १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी लाइव्ह फोकस सपोर्ट देखील यात आहे. तर, फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १३ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, Samsung Galaxy M32 5G मध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे, जी १५ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. तसेच, फोनमध्ये १ TB विस्तारीत स्टोरेज आहे. फोनचे परिमाण ०.९ x7.६x१६.४ cm असेल. तर फोनचे वजन २०२ ग्रॅम असून फोन एनएफसी, वायफाय, ब्लूटूथ आणि यूएसबी कनेक्टिव्हिटीसह येतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l0Uz3y