नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच रियलमीने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स आणि ला लाँच केले आहे. यातील 8s 5G खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Realme 8i चा पहिला सेल आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. हा फोन , Samsung Galaxy M21 2021 Edition आणि Poco M3 सारख्या स्मार्टफोन्सला टक्कर देईल. ८आयच्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. Realme 8i ची किंमत आणि ऑफर्स: फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. फोनला आजपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट Realme.com वरून खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी केल्यास १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास हे डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट ऑफर्सबद्दल सांगायचे तर येथे देखील १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. हे डिस्काउंट एचडीएफसी क्रेडिट कार्डवर मिळेल.याशिवाय अनेक कार्ड्सवर ऑफर्स मिळत आहे. यूजर्स दरमहिना ४८३ रुपये देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर फोन खरेदी करू शकतात. Realme 8i चे फीचर्स: ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. यामध्ये ६.६ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४१२ आहे. स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.८० टक्के आहे. यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G96 SoC सह ६ जीबी रॅम दिली आहे. रॅमला ५ जीबीपर्यंत व्हर्च्युअली वाढवू शकता. फोनमध्ये १२८ जीबी स्टोरेज दिले असून, मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. यात प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल आहे, जो Samsung S५KJN१ सेंसरसह येतो. दुसरा २ मेगापिक्सल मोनोक्रोम आणि तिसरा २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी VoLTE, ड्यूल बँड, वाय-फाय, ब्लूटूथ ५.० मायक्रो यूएसबी सारखे फीचर्स दिले आहे. पॉवरसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C7pPVk