नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात अनेक शानदार स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. यात रियलमीपासून ते ओप्पोच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात कोणते फोन्स लाँच झाले आहेत, ते पाहुयात. वाचा: कंपनीने या फोनला नवीन डिझाइनसह लाँच केले आहे. यात मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसर दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. ६००० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किमत ११,४९९ रुपये आहे. हा एक बजेट फोन आहे. यात ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. यात ६.५ इंच डिस्प्ले दिला आहे. फोन डायगनल स्ट्राइप डिझाइनसह येतो. याची किंमत ७,४९९ रुपये आहे. Redmi 9 Activ Redmi 9 Activ ला देखील गेल्या आठवड्यात लाँच केले आहे. फोन मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसर, ५००० एमएएचची बॅटरी, एआय ड्यूल रियर कॅमेऱ्यासह येतो. याची किंमत ९,४९९ रुपयांपासून सुरू होते. ओप्पोच्या या फोनमध्ये रियरला एआय ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ५००० एमएएचची बॅटरीसह येणाऱ्या फोनला १३,९९० रुपयात खरेदी करू शकता. Nokia G50 5G ला देखील गेल्या आठवड्यात लाँच केले आहे. यात ५जी, ४८ मेगापिक्सल, स्टॉक अँड्राइड ११ आणि इतर फीचर्स दिले आहे. याची किंमत १९९.९९ GBP (जवळपास २० हजार रुपये) आहे. भारतातील लाँचबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. Realme GT Neo 2 ला गेल्या आठवड्यात चीनमध्ये लाँच केले आहे. यात १२० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर दिला आहे. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल आहे. फोनची किंमत २,४९९ CNY (जवळपास २८,००० रुपये) आहे. फोनला ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच केले जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AKKBtN