नवी दिल्ली: Honor ने नुकताच चीनमध्ये आयोजित कार्यक्रमात मॅजिकबुक लाइनअप अंतर्गत काही भन्नाट लॅपटॉप लाँच केले आहेत. ज्यात, चा समावेश आहे. इंटेल इव्हो प्लॅटफॉर्म प्रमाणित होणारे हे Honor चे पहिलेच नोटबुक आणि नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह पूर्व-स्थापित जगातील पहिलाच लॅपटॉप आहे. Honor MagicBook V 14 मध्ये १४.२ इंच एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले ३: २ आस्पेक्ट रेशियो, २.५ के स्क्रीन रिझोल्यूशनसह ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. हे डिव्हाइस १०० % एसआरजीबी कलर गामट कव्हर करते. सोबतच, १.०७ अब्ज रंग प्रदर्शन आणि जास्तीत जास्त ४०० nits ब्राइटनेस प्रदान करते. वाचा: Honor MagicBook V 14 ची वैशिष्ट्ये : विशेष म्हणजे, यात व्हिडिओ कॉलची गुणवत्ता सुधारण्यासाठी लॅपटॉप ISP चिपसह ५ मेगापिक्सलचा ड्युअल-कॅमेरा सेटअप मिळतो. हे चार स्पीकर्स आणि चार मायक्रोफोनसह दिशात्मक पिकअप तसेच ५ मीटर दूर-क्षेत्रातील पिकअपसह येते. हुड अंतर्गत, डिव्हाइस इंटेल कोर i5-1132H प्रोसेसरद्वारे समर्थित आहे तर, टॉप-एंड मॉडेल कोर i7-11390H प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. ग्राफिक्स प्रक्रियेची काळजी घेण्यासाठी एक NVIDIA MX450 GPU आहे. ऑनर १६ GB रॅम आणि ५१२ GB NVMe स्टोरेज पर्यंत पॅक करण्यासाठी डिव्हाइस ऑफर करते. हा लॅपटॉप दुहेरी पंखे आणि दुहेरी उष्णता पाईप्ससह येतो. ज्यामुळे, उष्णता कमी होते. पॉवर बटणात फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. जे, ०.७ सेकंदात डिव्हाइस अनलॉक करू शकते. Honor MagicBook V 14 : किंमत यात तीन मॉडेल्स आहेत आणि आता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. ६ ऑक्टोबर पासून मॉडेल्स खरेदीसाठी उपलब्ध होतील. Honor MagicBook V 14 च्या बेस मॉडेल- इंटेल कोर i5-1132H प्रोसेसर, १६ GB रॅम, ५१२ GB NVMe स्टोरेज आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्सची किंमत ६,१९९ युआन (७०,६६८ रुपये) असून डिव्हाइस स्टार ग्रे आणि ग्लेशियल सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, दुसरे मॉडेल इंटेल कोर i5-1132H प्रोसेसर, १६ GB रॅम, ५१२ GB स्टोरेज आणि NVIDIA MX450 GPU सह येत असून ते स्टारी स्काय ग्रे रंगात ६,९९९ युआन (७९,७४३ रुपये) मध्ये उपलब्ध आहे. टॉप-एंड मॉडेलमध्ये इंटेल कोर i7-11390H प्रोसेसर, १६ GB रॅम, ५१२ GB स्टोरेज आणि NVIDIA MX450 स्वतंत्र डिस्प्ले आहे. याची किंमत ७,९९९ युआन (९१,१६६ रुपये) असून ते स्टारी स्काय ग्रे आणि डॉन ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ob056L