नवी दिल्ली: या वर्षाच्या सुरुवातीला, Realme तर्फे X7 Max 5G लाँच करण्यात आला. हा फोन ८GB + १२८ GB आणि १२ GB + २५६ GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसह दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला असून याची सुरुवातीची किंमत २६,९९९ आहे. तर, १२ GB + २५६ GB वेरिएंट २९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अलीकडेच, या डिव्हाइसची जागा Realme GT 5G ने भारतातील कंपनीचा टॉप-स्तरीय फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून घेतली. तर, X7 Max अजूनही त्याच्या कार्यक्षमता युनिट आणि इतर वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट मूल्य ग्राहकांना देत आहे आणि आता ही डील अधिक फायदेशीर करण्यासाठी हा फोन फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाचा: भारतात Realme X7 Max ची किंमत Realme X7 Max मूळतः भारतात २६,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाला होता. ही किंमत ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसाठी आहे. आता तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर ६,००० रुपयांच्या मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. युजर्स कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून Realme X7 Max च्या विक्री किंमतीवर ६,००० रुपयांची त्वरित सूट घेऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हीही फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो. या डिस्काउंटमुळे स्मार्टफोनच्या ८ GB + १२८ GB रॅम व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये झाली आहे. ही ऑफर १२ जीबी रॅम पर्यायावरही लागू आहे, ज्याची किंमत ऑफरनंतर २३,९९९ रुपये इतकी होईल . या मर्यादित वेळेच्या ऑफरचा आनंद तुम्ही फक्त फ्लिपकार्टद्वारे घेऊ शकता. Realme X7 Max : वैशिष्ट्ये X7 Max MediaTek Dimensity १२०० चिपसेटवर ऑफर केला जातो. यात १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज सुविधा आहे. फोन ५० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,५०० mAh बॅटरी पॅक करतो. मागील बाजूस, यात ६४ एमपी प्राथमिक सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा प्रणालीमध्ये ८ एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा देखील समाविष्ट आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६. ४३ -इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि ३६० Hz टच-सॅम्पलिंग रेट आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात ७ 5G बँड, वायफाय ६, ब्लूटूथ ५. १ , जीपीएस इत्यादी सुविधा देखील मिळत आहे. हे डिव्हाइस अँड्रॉइड ११. आधारित Realme UI २.० वर चालू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jZm12g