नवी दिल्ली : ९ सप्टेंबरला भारतात आपला नवीन लाँच करणार आहे. फ्लिपकार्टवर रियलमी पॅडच्या उपलब्धतेबाबत माहिती समोर आली असून, या डिव्हाइससाठी एक वेगळे पेज बनवण्यात आले आहे. या पेजद्वारे रियलमी पॅडच्या मुख्य स्पेसिफिकेशन्स, डिस्प्लेची माहिती समोर आली आहे. लिस्टिंगमध्ये टॅबलेटच्या फ्रंट व रियर डिझाइनची देखील माहिती मिळते. वाचा: फ्लिपकार्टवरील टीझर पेजनुसार, रियलमी पॅडमध्ये १०.४ इंच फुलस्क्रीन WUXGA+ डिस्प्ले मिळेल. याचे रिझॉल्यूशन २०००x१२०० पिक्सल असेल. स्क्रीन टू-बॉडी रेशियो ८२.५ टक्के असेल. फ्लिपकार्ट लिस्टिंग पेजवरील फोटोमध्ये टॅबलेटच्या चारही बाजूला पातळ बेझल्स दिले आहे. तर पुढील बाजूला एक फ्रंट कॅमेरा दिसत आहे. रियलमी पॅडमध्ये रियरला वरच्या कोपऱ्यावर सिंगल कॅमेरा सेटअप मिळेल. पॅड गोल्ड फिनिशसोबत येतो. मात्र, लीकनुसार, टॅबलेटला ग्रे फिनिशसोबत देखील सादर केले जाऊ शकते. रियर पॅनेलच्या कोपऱ्यावर रियलमीचा लोगो दिसत आहे. रियलमी पॅडला ९ सप्टेंबरला दुपारा १२.३० वाजता लाँच केले जाईल. लाँच इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. ट्विटरवरील एका टीझरनुसार, स्पीकर ग्रिल आणि यूएसबी पोर्टमध्ये खालील बाजूला मिळेल. टॅबलेटमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळू शकतो. रियलमी पॅडमध्ये फ्रंट व रियरला ८ मेगापिक्सल सेंसर मिळेल. याआधी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये माहिती मिळाली होती की, टॅबलेट अॅल्यूमिनियम यूनिबॉडीद्वारे बनलेला असेल. या टॅबलेटमध्ये एक यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WXCdby