नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप ने नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज च्या पाचव्या सीझन निमित्ताने नावाने एक स्टिकर पॅक सादर केले आहे. फेसबुकच्या मालकीच्या या अ‍ॅपने हे खास स्टिकर पॅक लाँच करत मनी हाइस्टच्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. वाचा: Android आणि iOS यूजर्सला करता येणार वापर अँड्राइड आणि आयओएस दोन्ही यूजर्स Money Heist च्या कॅरेक्टर आणि इव्हेंटच्या आधारावर स्टिकर शेअर करण्यासाठी स्टीकर पॅक डाउनलोड करू शकतात. यात टोकियो, लिस्बन, मॉस्को, बर्लिन, नेरोबी, रियो, डेन्वर, स्टॉकहोम, बोगोटा, पार्लेमो आणि प्रोफेसरचे चित्र असलेले स्टिकर पाठवता येतील. अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅकला Mucho पिक्सलद्वारे डिझाइन करण्यात आले असून, यात एकूण १७ स्टिकर आहेत व याची साइज ६५८केबी आहे. WhatsApp वर Money Heist स्टिकर असे करा डाउनलोड.
  • सर्वात प्रथम WhatsApp उघडा.
  • आता चॅट विंडो उघडा.
  • त्यानंतर स्टिकर आयकॉनवर क्लिक करा.
  • WhatsApp च्या स्टिकर स्टोरमध्ये Sticker Heist अ‍ॅनिमेटेड स्टिकर निवडा.
  • आता हा स्टिकर पॅक डाउनलोड करा.
  • एकदा डाउनलोड केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडोच्या खाली स्टिकवर क्लिक करा व तुमच्या आवडीचे Money Heist स्टिकर निवडून पाठवू शकता.
WhatsApp आणणार मेसेज रिएक्शन फीचर दरम्यान, WhatsApp मेसेज रिएक्शन फीचरचे टेस्टिंग करत आहे. याद्वार यूजर्सला इमोजीच्या माध्यमातून उत्तर देता येईल. आयमेसेज, ट्विटर, इंस्टाग्राम आणि मेसेंजरवर हा पर्याय आधीपासूनच आहे. हे फीचर कधी रोल आउट होणार याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार, WhatsApp अँड्राइड बिटा व्हर्जनसाठी हे फीचर आणण्यावर काम करत आहे. WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, मेसेज रिएक्शन अ‍ॅपमध्ये टेक्स्टच्या खाली दिसेल. हे फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी उपलब्ध असेल. चॅटिंग आधी इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी व मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर यूजर्सला आकर्षित करण्यासाठी WhatsApp नवनवीन स्टिक आणत आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधनाच्या निमित्ताने देखील एक स्टिकर जारी केले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WWvNZH