Full Width(True/False)

बहुप्रतीक्षित Redmi 10 Prime आणि Redmi TWS Earbuds आज होणार लाँच, पाहा फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली: आज आयोजित इव्हेंटमध्ये बहुचर्चित स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. तसेच, Redmi TWS इयरबड्स देखील याच दरम्यान बाजारात दाखल केले जातील. दुपारी १२ वाजता हा लाँच इव्हेंट कंपनीच्या यूट्यूब पेजवर Live Stream करण्यात येणार असून लाँच होण्यापूर्वीच , आगामी Redmi 10 Prime स्मार्टफोनचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. ज्यानुसार Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची मेगा बॅटरी देण्यात येणार असल्याचे समजते. कंपनीने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट असेल. तर, Redmi TWS इयरबड्मध्ये ३० तासांची बॅटरी लाईफ असेल. पाहा डिटेल्स. वाचा: Redmi 10 Prime : संभाव्य वैशिष्ट्ये Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा FHD + LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचे रिझोल्यूशन २,४०० X १,०८० पिक्सेल आणि रिफ्रेश रेट ९० Hz असेल. फोन MediaTek Helio G88 SoC चिपसेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये ६GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज असेल. मेमरी कार्डच्या मदतीने फोन स्टोरेज वाढवता येईल. हँडसेट Android ११ आधारित MIUI १२.५ कस्टम स्किनवर काम करेल. Redmi 10 Prime मध्ये ६,००० mAh ची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोन 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्टला सपोर्ट करेल. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील दिला जाऊ शकतो. त्याचा मुख्य कॅमेरा ५० MP चा असेल. याशिवाय ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ एमपीचा लेन्स देण्यात आला आहे. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्टसह येईल. किमतीबद्धल सांगायचे तर ,Redmi 10 Prime ची सुरुवातीची किंमत १५,००० रुपयांपेक्षा कमी असेल. तर, Redmi इयरबड्सची किंमत ५,००० रुपयांपेक्षा कमी असेल. Redmi TWS Earbuds: वैशिष्ट्ये Redmi ट्रू वायरलेस इयरबड्सचे (TWS) चार्जिंग केस अंड्याच्या आकाराचे असेल. म्हणजेच Redmi Earbuds डिझाइनच्या बाबतीत Samsung Galaxy बड्ससारखे असतील. Redmi TWS इयरबड्स क्वालकॉम चिपसेट सपोर्टसह दिले जातील. जे aptX अनुकूलीत कोडला समर्थन देते. Redmi TW इयरबड्समध्ये ड्युअल ड्रायव्हर सपोर्ट दिला जाऊ शकतो, जो ब्लूटूथ v५.२ कनेक्टिव्हिटीसह येईल. इयरबड्समध्ये ३० तासांचा बॅटरी बॅकअप देखील दिला जाऊ शकतो. हे इयरबड्स स्प्लॅश/ स्वेटप्रूफ डिझाइन आणि टच कंट्रोलसह येतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YecYlu