नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ () यूजर्सला बेस्ट बेनिफिटचे अनेक प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये युजर्संना डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत अनेक फायदे मिळतात. प्लान्सची मोठी लिस्ट दरम्यान असा एक रिचार्ज प्लान आहे. याच्यासमोर एअरटेल आणि वोडाफोन आयडिया काहीच नाही. जिओच्या या प्लान संबंधी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत, या प्लानची किंमत ३४९९ रुपये आहे. जाणून घ्या डिटेल्स. जिओचा ३४९९ रुपयाच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट ३६५ दिवसाच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा देत आहे. या हिशोबाप्रमाणे कंपनी एकूण १०९५ जीबी डेटा देत आहे. याशिवाय, प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देते. रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. युजर्संना जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारखे अॅप्सचे फ्री अॅक्सेस ऑफर केले जातात. एअरटेल आणि वोडाफोनकडे नाही ३६५ दिवसांपर्यंतचा ३ जीबी डेटाचा प्लान अनलिमिटेड प्लान्सच्या कॅटेगरीत जिओ शिवाय, कोणत्याही कंपनीकडे ३ जीबी डेटा ऑफर नाही. एअरटेलकडे एक प्लान आहे. याची किंमत २७९८ रुपये आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसाच्या वैधतेसोबत रोज २ जीबी डेटा प्लान मिळतो. याशिवाय, प्लानमध्ये तुम्हाला डेली १०० फ्री एसएमएस आणि देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट म्हणजे एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय, प्लानमध्ये कंपनी ३० दिवसांसाठी अमेझॉन व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे फ्री ट्रायल देत आहे. जर वोडाफोन आयडिया युज्रसंना २५९५ रुपयाच्या प्लानमध्ये ३६५ दिवसाची वैधता दिली जात आहे. या प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा सोबत रोज १०० फ्री एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये कंपनी बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट देत आहे. याशिवाय, या प्लानमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री अॅक्सेस देते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hewm8F