नवी दिल्लीः Samsung ने भारतात बजट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे. नवीन किंमत ७ सप्टेंबर पासून ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही स्टोर्सवर लागू झाली आहे. दोन्ही फोन एकाच हार्डवेयरने बनवले आहे तसेच एकच डिझाइन दिली आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 90Hz डिस्प्ले, क्वाड-रियर कॅमेरा, 6000mAh ची बॅटरी दिली आहे. दोन्ही फोनला फक्त रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन बनवते. सॅमसंग Galaxy M12 आणि Galaxy F12 च्या नवीन किंमती संबंधी जाणून घ्या. आणि Galaxy F12 च्या किंमतीत इतकी झाली वाढ ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या सॅमसंग गॅलेक्सी एम १२ ची किंमत आता ११ हजार ४९९ रुपये झाली आहे. याची किंमत आधी १० हजार ९९९ रुपये होती. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या गॅलेक्सी F12 स्मार्टफोनची किंमत आता १० हजार ९९९ रुपये ते ११ हजार ४९९ रुपये झाली आहे. यासोबतच Galaxy F12 च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत आता १२ हजार ४९९ रुपये झाली आहे. Samsung Galaxy M12 आणि Galaxy F12 चे स्पेसिफिकेशन्स सॅमसंगने गॅलेक्सी M12 ला रिब्रँड केले आहे. एक महिन्यानंतर याला गॅलेक्सी एफ १२ च्या रुपात लाँच केले आहे. दोन्ही डिव्हाइस समान हार्डवेयर आणि समान डिझाइन आहे. Exynos 850 SoC प्रोसेसर आहे. ज्याला 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सोबत येते. 90Hz रिफ्रेश रेट आणि वाटरड्रॉप नॉच सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. दोन्ही फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली आहे. USB टाइप-सी पोर्ट द्वारे 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3heo7JL