Full Width(True/False)

Sony Audio Days Sale मध्ये हेडफोन्स, ईयरबड्ससह इतर प्रोडक्ट्सवर मिळतेय १२,००० रुपयांपर्यंत सूट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली : Sony Audio डेज सेलला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून ग्राहकांना याचा लाभ ५ सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. यामध्ये, या सेलमध्ये हेडफोन, ट्रू वायरलेस इयरबड्स (TWS), पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स आणि पार्टी स्पीकर्स सारखे ऑडिओ प्रोडक्ट्स अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहे . खरेदीदार रिटेल स्टोअर (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), Sony ऑनलाइन स्टोअर आणि इतर प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइटवरून प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. वाचा: Sony चे Noise Cancellation सह येणारे ४ हेडफोन मॉडेल सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, यापैकी Amazon वर उपलब्ध असलेल्या एका हेडफोन मॉडेलवर तब्बल १२,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर, दोन हेडफोन ५, ००० रुपयांच्या सूटसह आणि एक हेडफोन मूळ किंमतीपेक्षा ७,००० रुपयांच्या सूटसह उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त,५ इतर हेडफोन मॉडेल्स देखील या सेलमध्ये मोठ्या सवलतीसह उपलब्ध करण्यात आले आहेत. तुम्ही हे हेडफोन ३,००० रुपयांपर्यंत सूट मिळवून खरेदी करू शकता. हे फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. त्याचे दोन मॉडेल ६,००० आणि ७,००० रुपयांच्या सूटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Sony च्या या Sony Audio डेज सेलमध्ये पार्टी स्पीकर्स आणि ब्लूटूथ स्पीकर्स देखील सवलतीसह तुम्ही खरेदी करू शकता. यात पार्टी स्पीकर्सवर ५,००० ते ७,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर, ब्लूटूथ स्पीकर्स ५,००० रुपयांपर्यंतच्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yGp2su