Full Width(True/False)

खऱ्या आयुष्यातही मरणाच्या दारातून परतलेला 'Money Heist' चा प्रोफेसर

मुंबई- संपूर्ण जगात गाजणारी नेटफ्लिक्सची वेबसीरिज 'मनी हाइस्ट' चे चार सीजन यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आज ३ सप्टेंबर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी '' चा पाचवा सीजन प्रदर्शित झाला. भारतीय प्रेक्षकही '' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. सीरिजमध्ये पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. प्रोफेसर सोबत पुढे काय होणार, तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होणार की प्रोफेसरचा प्लॅन वाया जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. परंतु, वेबसीरिजप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही प्रोफेसर अल्वारो मरणाच्या दारातून परत आला होता. ज्याप्रमाणे वेबसीरिजमध्ये प्रोफेसर योद्धा बनून सगळ्यांना वाचवताना दिसतो, त्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढा द्यावा लागला होता. डॉक्टरांनी अल्वारोला फक्त तीन महिन्याचा कालावधी दिला होता. २०११ साली अल्वारोला कर्करोगाची लागण झाली होती. अल्वारोच्या डाव्या पायात कर्करोगाच्या गाठी तयार झाल्या होत्या. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अल्वारोने सांगितलं की, 'मला आजही आठवतंय जेव्हा डॉक्टर पांढरा कोट घालून गुंगीचं औषध सोबत घेऊन मला माझ्या कर्करोगाबद्दल सांगायला आले होते. ते म्हणाले होते माझ्याकडे फक्त तीन महिने आहेत. त्यानंतर कुणीही मला वाचवू शकणार नाही.' अल्वारो पुढे म्हणाला, 'मी सुरुवातीला माझ्या कर्करोगाला खूप साधेपणाने घेतलं. आपल्याला ताप येतो, आपल्याला अस्वस्थ वाटतं आणि थोड्या दिवसात आपण बरे होतो तसंच. पण इथे परिस्थिती वेगळी होती हे मला फार नंतर कळालं. मला या बद्दल कळताच माझ्या मनात सगळ्यात आधी मरणाचा विचार आला. मी माझ्या सोबत असलेल्या व्यक्तींसोबत कसा वागलो हे आठवलं. मला जाणवलं की वाचण्याची शक्यता कमी आहे. काही महिन्यात मी मरणार आहे.' पण प्रोफेसरने त्या परिस्थितीवर मात केली. योग्य प्रकारे औषधं घेऊन आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर अल्वारोचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DHkUft