नवी दिल्ली : राजस्थानच्या आयटी विभागाने टेलिकॉम कंपनी ला आदेश दिला आहे. यात ग्राहकाला २७.५ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. एका व्यक्तीने कोणतेही व्हेरिफिकेशन न करता दुसऱ्या ग्राहकाच्या नंबरचे डुप्लिकेट सिम क्लेम केले आहे. ज्या ग्राहकाला कंपनीच्या चुकीमुळे मिळाले, त्याने पहिल्या ग्राहकाच्या खात्यातून तब्बल ६८ लाख रुपये उडवल्याचे समोर आले होते. हे सिम कार्ड ओव्हरड्राफ्ट सर्व्हिसशी जोडलेले होते. वाचा: वीआयकडून जारी करण्यात आलेल्या बनावट सिम कार्डच्या मदतीने व्यक्तीने खात्यातून पैसे ट्रांसफर करून घेतले. डुप्लिकेट सिम कार्ड जारी करण्यासाठी व्हेरिफिकेशनची आवश्यकता असते. मात्र, या प्रकरणात ग्राहकाच्या आयडी प्रुफचे व्हेरिफिकेशन योग्यरित्या झाले नाही. चुकीच्या ग्राहकाला दिले डुप्लिकेट सिम रिपोर्टनुसार, हे प्रकरण भानु नावाच्या ग्राहकाचे आहे. या व्यक्तीला दुसऱ्या ग्राहकाचे सिम कार्ड देण्यात आले. याचा फायदा घेत भानुने आयडीबीआय बँक खात्यातून ६८.५ लाख रुपये आपल्या खात्यात ट्रांसफर केले. यूजर कृष्ण लालचा मोबाइल नंबर मे २०१७ मध्ये बंद झाला होता. त्यानंतर ते हनुमानगढ येथील वीआयच्या स्टोरवर गेले व त्यांनी तक्रार केली. मात्र, अनेकदा तक्रार केल्यानंतर देखील त्यांचा नंबर सुरू झाला नाही. जयपूरच्या एका स्टोरमध्ये देखील त्यांनी सिम चालू करण्यासाठी तक्रार केली. दुसऱ्या दिवशी सिम चालू झाले. मात्र, तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला डुप्लिकेट सिम मिळाले होते व ओटीपीचा वापर करून त्याने खात्यातून रक्कम ट्रांसफर करून घेतली होती. कथितरित्या, सिम कार्ड मिळाल्यानंतर ५ दिवसातच त्या व्यक्तीने त्याचा वापर केला. सिम कार्ड सुरु झाल्यानंतर व्यक्तीला खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा मेसेज मिळाला. त्यानंतर ग्राहकाने याप्रकरणाबाबत तक्रार केली. आता वीआयला आयटी कायद्यांतर्गत भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, ज्या व्यक्तीने पैसे काढले त्याला अटक केले आहे. त्याने ६८ लाख रुपयांपैकी ४४ लाख रुपये परत केले आहेत व इतर रक्कम बाकी आहे. ग्राहकाने आयटी कायद्यांतर्गत याबाबत तक्रार केली. ग्राहकाच्या डेटाचे अयोग्य व्हेरिफिकेशन आणि नवीन सिम कार्ड सुरू करण्यास विलंब यासाठी वीआयला दंड आकारण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lgm5tX