नवी दिल्लीः रेडमी सध्या आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी हा फोन लवकरच यूरोप सह अनेक मार्केट्स मध्ये लाँच करू शकतो. फोनची लाँचिंग डेट संबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु, या दरम्यान, लीकमध्ये याच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. टिप्स्टर Roland Quandt च्या माहितीनुसार, रेडमी १० स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंतचे इंटरनल स्टोरेज सोबत येईल. याची सुरुवातीची किंमत १७९ यूरो म्हणजेच जवळपास १५ हजार ५५० रुपये असणार आहे. कंपनीचा हा फोन मलेशिया आणि अमेरिकेत आधीच लाँच करण्यात आला आहे. रेडमी १० चे फीचर आणि स्पेसिफिकेशन रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी पॅनल दिले आहे. पंच होल डिझाइन आणि थिक बेजल्स सोबत येणाऱ्या या फोनमध्ये कंपनी 90Hz चे अडेप्टिव सिंक रिफ्रेश रेट ऑफर करीत आहे. अमेरिकेत हा स्मार्टफोन पेबल व्हाइट, कार्बन ग्रे आणि सी ब्लू कलर ऑप्शनमध्ये येते. रेडमी १० चा ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८८ चिपसेट ऑफर करीत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12.5 वर काम करतो. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५.१, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे ऑप्शन दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hs74UH