Full Width(True/False)

आता थेट WhatsApp वरून बुक करा घरगुती गॅस सिलेंडर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : गॅस सिलेंडरचा वापर आपल्या सर्वांच्या घरात होतो. गॅस बुकिंगसाठी आता एंजेसीत जाण्याची गरज पडत नाही. तुम्ही घरबसल्या बुकिंग करू शकता. ग्राहक सिलेंडरला केवळ कॉलकरून IVR द्वारे बुक करू शकतात. आता इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप वरून देखील गॅस बुकिंग करता येणार आहे. यामुळे आधीच्या तुलनेत प्रक्रिया अधिक सोपी होईल. व्हॉट्सअ‍ॅपवरून गॅस कसे बुक करू शकता, याची प्रोसेस जाणून घेऊया. वाचा: चे ग्राहक असे बुक करू शकतात सिलेंडर इंडेन कंपनीचे ग्राहक एलपीजी बुकिंगसाठी ७७१८९५५५५५ नंबरवर कॉल करू शकतात. ग्राहकांना WhatsApp वरुन बुकिंगची सुविधा मिळेल. यासाठी ७५८८८८८८२४ या WhatsApp नंबरवर REFILL लिहून मेसेज पाठवावा लागेल. ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड नंबरवरूनच मेसेज करावा लागेल. चे ग्राहक असे बुक करू शकतात सिलेंडर एचपी कंपनीचे ग्राहक एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ९२२२२०११२२ नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरून देखील गॅस बुक करता येईल. यासाठी ९२२२२०११२२ या WhatsApp नंबरवर BOOK लिहून मेसेज करावा लागेल. लक्षात ठेवा की ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरूनच मेसेज करावा लागेल. येथून सबसीडीची देखील माहिती मिळेल. चे ग्राहक असे बुक करू शकतात सिलेंडर एलपीजी गॅसचे ग्राहक १८००२२४३४४ नंबरवर कॉल करून बुकिंग करू शकतात. नंबरवर कॉल केल्यानंतर १ दाबून सिलेंडर बुक करू शकता. यानंतर बुकिंग रिक्वेस्ट स्विकारली जाईल व WhatsApp वर अलर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3znq1hf