Full Width(True/False)

ग्रीन टीवर रिसर्च करणाऱ्या सुजीमुरांच्या जन्मदिनी गुगलचे खास डुडल, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः ग्रीन टीवर रिसर्च करणारी महिला जपानची वैज्ञानिक यांच्या १३३ व्या जयंती दिनी आज शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी गुगलने खास डुडल बनवून त्यांना अभिवादन केले आहे. मिशियो सुजीमुरा यांच्या १३३ व्या जयंतीदिनी गुगलने खास त्यांना ग्रीन टीच्या रासायनिक घटकाचे अध्ययन आणि त्यांना काढताना दाखवले आहे. गुगलच्या अक्षराला बनवण्यासाठी अनेक पद्धतीने शोध घटक जसे चहा, झाडे, एक कप ग्रीन टी, एक पेन, एक फ्लास्क आणि एक नोटपॅडचा वापर केला आहे. १७ सप्टेंबर १८८८ रोजी मिशियो सुजीमुरा यांचा जन्म जपानमधील सैतामातील ओकेगावा शहरात झाला होता. सुजीमुरा यांना शाळेत असताना वैज्ञानिक रिसर्च मध्ये आपले करिअर बनवण्यासाठी प्रेरणा मिळाली होती. सुजीमुरा यांना पदवी मिळाल्यानंतर त्यांनी १९२० मध्ये होक्काइडो इंपिरियल विद्यापीठात जाण्याआदी महिलांना दोन वेगवेगळ्या शाळेत शिकवले. ज्यावेळी त्यांनी होक्काइंडो इंपिरियल विद्यापीठात एक प्राध्यापक म्हमून प्रयोगशाळेत सहायक रुपाने काम करायला सुरुवात केली. १९२२ मध्ये मिशियो सुजीमुरा यांना टोकियो इंपिरियल विद्यापीठात ट्रान्सफर करण्यात आले होते. परंतु, ज्या लॅबमध्ये काम करीत होत्या. त्या १९२३ मध्ये विनाशकारी भूकंप दरम्यान सर्वकाही संपले होते. त्यानंतर त्या एका अन्य लॅबमध्ये काम करण्यासाठी गेल्या. कृषिचे एक डॉक्टर डॉक्टर उमेतारो सुझुकीच्या टीममध्ये काम करण्यासाठी गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी विटामिन बी १ चा शोध लावला. या लॅबमध्ये काम करीत असताना मिशियो सुजीमुरा आणि त्यांची सहकारी सीतारो मिउरा यांनी ग्रीन टी ला विटामिन सी ला एका प्राकृतिक रुपाने शोधून काढले. त्यांच्या या शोधामुळे उत्तरी अमेरिका मध्ये निर्यात करण्यात येणाऱ्या ग्रीन टीची मात्रा वाढली. सुजीमुरा यांना ग्रीन टीवर त्यांच्या रिसर्च साठी १९५६ मध्ये कृषि विज्ञानच्या जपान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९६८ मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ द प्रीशियस क्राउन ऑफ द फोर्थ क्लास ने सन्मानित करण्यात आले आहे. मिशियो सुजीमुरा यांचे १ जून १९६९ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CiqTWw