नवी दिल्लीः संपूर्ण जगभरात आता हे एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाते. या अॅपद्वारे लोक एकमेकांशी चॅट करतात. चॅट शिवाय, लोक एकमेकांना मीडिया फाइल पाठवत असतात. त्यात फोटो, ऑडियो किंवा व्हिडिओच्या फाइल्स असतात. लोकांना हा अॅप खूप पसंत पडत आहे. या अॅपवरून मोठ्या फाइल पाठवण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु, अनेकदा त्या जात नाहीत. त्यामुळे या अॅपवर जास्तीत जास्त १६ एमबी ची फाइल पाठवू शकता. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा काही ट्रिक्स संबंधी माहिती देत आहोत. यावरून तुम्ही फाइल पाठवू शकता. Google Drive यावरून तुम्ही फोनवर Google ड्राइव ओपन करा. त्यानंतर होम स्क्रीनवर प्लस आयकॉनवर क्लिक करा. यासाठी तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. त्यावरून अपलोड करुन टॅप करा. फाइल गुगल ड्राइव्हवर अपलोड होणार आहे. आता या फाइलवर तीन डॉट मेन्यू वर क्लिक करा. पुन्हा कॉपी लिंकचा पर्याय निवडा. आता व्हॉट्सअॅपला ओपन करा. त्या व्यक्तीचा चॅट बॉक्स ओपन करा. ज्यांना तुम्हाला मोठी फाइल पाठवायची आहे. यानंतर चॅट बॉक्स मध्ये लिंक पेस्ट करा आणि पाठवा. याच्या मदतीने तुम्ही मोठी फाइल सहज व्हॉट्सअॅपवरून पाठवू शकता. Video Compressor व्हिडिओ कंप्रेसर सॉफ्टवेयरच्या मदतीने तुम्ही मोठ्यातील मोठी व्हिडिओ फाइल कमी साइज करून पाठवू शकता. यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंप्रेसर सॉफ्टवेयर आपल्या मोबाइल किंवा कंप्यूटर मध्ये इंस्टॉल करा. यानंतर मोठी व्हिडिओ फाइल यात टाका आणि कम्प्रेस करा. पुन्हा कंम्प्रेस व्हिडिओला तुम्ही व्हॉट्सअॅपच्या मदतीने ज्याला पाठवायचे आहे त्याला पाठवू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zRlRQ8