नवी दिल्ली : हे फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अॅप जगातील सर्वात लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅपचा वापर जगभरातील लोक करतात आणि व्यासपीठावर विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक, गृहिणी आणि अगदी आजी -आजोबा असे सर्व प्रकारचे युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप संभाषण अधिक सहज सुलभ करते आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन व्हॉट्सअॅपवरील सर्व संभाषणे सुरक्षित करते. पण, Read Receiptsआणि Last Seen सारखी फीचर्स मात्र काही प्रमाणात युजर्सची स्पेसच हिरावून घेतात . वाचा: व्हॉट्सअॅप रीड रिसिट फीचर मेसेज पाठवणाऱ्याला त्यांनी शेअर केलेल्या मेसेजचे स्टेटस जाणून घेण्याची परवानगी देते. सिंगल टिक म्हणजे मेसेज पाठवला गेला आहे परंतु रिसिव्हरला मिळाला नाही. दुहेरी टिकचा अर्थ की रिसीव्हरला मेसेज मिळाला आहे आहे. परंतु, अद्याप त्याने तो पाहिला नाही. डबल ब्लू टिक म्हणजे रिसिव्हरने मेसेज पहिला आणि वाचला. अनेकदा व्हॉट्सअॅप मेसेज वाचल्यानंतर त्याला उत्तर दिले नाही तर मेसेज पाठवणाऱ्या आणि रिसिव्हरमध्ये वाद नाही, पण वादासारखी परिस्थिती नक्कीच निर्माण होऊ शकतो. यावर देखील एक उपाय आहे. व्हॉट्सअॅपमध्ये हे फीचर बंद करण्याचा एक मार्ग आहे. म्हणजेच तुम्ही सर्व मेसेज वाचू शकाल आणि पाठवणाऱ्याला त्याबद्दल माहितीही नसेल. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील
  • तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप उघडा.
  • WhatsApp मध्ये सेटिंग्ज विभाग उघडा. सेटिंग्ज विभागात खाते पर्यायावर जा.
  • त्यानंतर आता गोपनीयता पर्यायावर टॅप करा.
  • व्हॉट्सअॅप रीड रिसीट पर्यायावर खाली स्क्रोल करा आणि ते डिसेबल करा.
व्हॉट्सअॅपचे लास्ट सीन हे फीचर देखील चांगलेच लोकप्रिय आहे. पण, हे वैशिष्ट्य मित्र, कुटुंब आणि सहकारी यांच्यामध्ये थोडा वाद निर्माण करू शकते. हे वैशिष्ट्य युजर्सना शेवटच्या वेळी व्हॉट्सअॅपवर कोण आणि कधी सक्रिय होतं याची माहिती देते. लास्ट सीन असे हाईड करा
  • तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप उघडा.
  • WhatsApp मध्ये सेटिंग्ज विभाग उघडा. आता, खाते सेटिंग्ज विभागात जा.
  • नंतर गोपनीयता पर्यायावर टॅप करा.
  • येथे, व्हॉट्सअॅप Last Seen पर्यायावर टॅप करा आणि Nobody निवडा.
वाचा: वाचा: वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38CnODY