नवी दिल्लीः सध्या जगभारात कोट्यवधी युजर्संची पसंती बनले आहे. व्हॉट्सअॅप मध्ये मिळणारे फीचर या दुसऱ्या मेसेजिंग अॅप्स पेक्षा थोडे वेगळे आहेत. युजर्संना कंटाळा येवू नये, यासाठी कंपनी नवीन नवीन फीचर्स आणत आहे. या यादीत आता व्हाट्सअॅप मध्ये आणखी एक नवीन फीचर येणार आहे. जे 'Last Seen' शी जोडले गेले आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आता लास्ट सीनमध्ये युजर्संना 'My contacts except...' चे ऑप्शन देण्याची तयारी करीत आहे. आता मिळतात तीन ऑप्शन हे फीचर आल्यानंतर युजरला माहिती होईल की, त्यांच्या व्हॉट्सअॅपचे लास्ट सीन कोण पाहत आहे. तसेच कोण पाहत नाही. आता व्हॉट्सअॅप मध्ये युजर्संना लास्ट सीन कस्टमाइज करण्यासाठी तीन ऑप्शन Everyone, My contacts आणि Nobody ही मिळतात. व्हॉट्सअॅपमध्ये My contacts except फीचरचा वापर करून कोणत्याही कॉन्टॅक्टला लास्ट सीनला हाइड करू शकता येईल. असे केल्यास ते लास्ट सीन पाहू शकणार नाहीत. iOS साठी डेव्हलप केले जात आहे फीचर रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचे हे फीचर आता iOS साठी डेव्हलप केले जात आहे. कंपनी याला अँड्रॉयड डिव्हाइसेजसाठी रोलआउट करणार की नाही. यासंबंधी अजून खात्रीशीरपणे काही सांगितले जावू शकत नाही. या फीचर संबंधी रिलीज डेट संबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अँड्रॉयड आणि iOS साठी लाँच झाले चॅट मायग्रेशन कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, ते युजर्संसाठी iOS वरून अँड्रॉयड वर व्हॉट्सअॅप हिस्ट्री ट्रान्सफर करण्याचे फीचर रोलआउट करीत आहे. याची सुरुवात सॅमसंगच्या स्मार्टफोनपासून करण्यात आली आहे. हे फीचर सॅमसंगच्या त्या स्मार्टफोन्ससाठी रोल आउट करण्यात आले आहे. जे अँड्रॉयड १० किंवा त्यापेक्षा जास्त ओएसवर काम करतात. आगामी काही दिवसात हे फीचर सर्व अँड्रॉयड डिव्हाइससाठी रोलआउट करणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Vpl9dQ