नवी दिल्ली : ने यावर्षी मार्चमध्ये OnePlus 9 5G लाँच केला होता. तुम्ही जर वनप्लसचा हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वरून हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. फोनच्या बेस मॉडेलची किंमत ४९,९९९ रुपये आहे. मात्र तुम्ही फक्त २८ हजार रुपयात खरेदी करू शकता. वाचाः OnePlus 9 5G वर ऑफर्स Amazon वर स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर मिळत आहे. तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डचा फोन वापरून फोन खरेदी केल्यास ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. यासोबतच, फोनवर १८,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. एक्सचेंज ऑफर फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून असेल. फोनवर १८,४५० रुपये पूर्ण लाभ मिळाल्यास ५० हजार रुपयांचा फोन २८,४५० रुपयात घरी नेऊ शकता. OnePlus 9 ची किंमत भारतात ९ ५जी स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजमध्ये मिळेल. फोन एस्ट्रल ब्लॅक, आर्कटिक स्काय आणि विंटर मिस्ट रंगात येतो. फोनच्या ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये आहे. OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे स्क्रीन रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटसह १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला वाढवता येईल. यात वार्प चार्ज ६५टी आउट-ऑफ-द-बॉक्ससह ४५०० एमएएचची बॅटरी मिळते. OnePlus 9चा कॅमेरा वनप्लस ९ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल सेंसर आहे. याशिवाय ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा आणि ड्यूल एलईडी फ्लॅश मिळेल. फ्रंटला १६ मेगापिक्सल सोनी IMX४७१ सेंसर आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DTkMtu