Full Width(True/False)

WhatsApp बिझनेस अ‍ॅपमध्ये येणार 'हे' खास फीचर, एका क्लिकवर सर्च करू शकता दुकान-सर्व्हिस

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या बिझनेस अ‍ॅपसाठी लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. यूजर्सला आता बिझनेस अ‍ॅपवर कोणतेही दुकान आणि सर्व्हिस सर्च करता येणार आहे. या फीचरचे सध्या ब्राझीलमध्ये टेस्टिंग सुरू आहे. आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपला पूर्णपणे ई-कॉमर्स अ‍ॅपमध्ये बदलण्याची तयारी करत आहे व अपकमिंग फीचर याचाच एक भाग आहे. वाचा: फेसबुक आणि इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती नसतात. त्यामुळे कंपनी बिझनेस अ‍ॅपच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील पुढील काळात जाहिराती दिसण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समध्ये इंस्टाग्राम स्टोरीजप्रमाणे जाहिरात पाहायला मिळेल. करोना महामारीच्या काळात ऑनलाइन रिटेलमध्ये वाढ झाली आहे. फेसबुक देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर शॉपिंग फीचर अपडेट करत आहे. फेसबुक शॉपिंग याचाच एक भाग आहे. मध्ये अनेक बिझनेस कॅटेगरी आहेत. ज्यात फूड, रिटेल आणि लोकल सर्व्हिसचा समावेश आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसीवरून गेल्याकाही दिवसात टीका झाली आहे. यानंतर कंपनीने स्पष्टीकरण देत यूजर्सचे लोकेशन ट्रॅक केले जात नसल्याचे व खासगी चॅट वाचले जात नसल्याचे म्हटले आहे. मात्र, बिझनेस अकाउंटवरून होणाऱ्या चॅटिंगवर लक्ष ठेवले जाते. कंपनीचे म्हणणे आहे की, जगभरातील असंख्य जाहिरातदार इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे click to WhatsApp चा वापर करत आहे. जेणेकरून, ग्राहकांशी थेट जोडता येईल. दरम्यान, २०१४ साली फेसबुकने WhatsApp ला तब्बल १४ लाख कोटी रुपयात खरेदी केले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VKqL2m